भाजपला पराभूत करण्यासाठी ‘विरा’ निवडणुकीच्या आखाड्यात?

भाजपला पराभूत करण्यासाठी ‘विरा’ निवडणुकीच्या आखाड्यात?

नागपूर : केंद्रात आणि राज्यात सत्ता आल्यानंतर स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करू, असे आश्वासन देऊन भाजपने वैदर्भीय जनतेला फसवले (BJP deceived the people of Vaidarbha) आहे. तसेच नागपूर महापालिकेतील सत्ता फक्त भाजपसाठी वापरण्यात येत असल्याने आगामी महापालिकेची निवडणूक (Municipal elections) लढण्याचा निर्णय विदर्भ राज्य आंदोलन समिती (Vidarbha State Movement Committee) घेणार आहे. (Vira-will-contest-elections-to-defeat-BJP?)

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या २७ जूनला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यकारिणीच्या बैठकीत निवडणुकीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी कळविले आहे. नागपूर महानगरपालिकेत पंधरा वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. येथे जनतेचे प्रश्‍न सोडविलेच जात नाही. सत्ता फक्त भाजपच्या नेत्यांसाठी व कार्यकर्त्यांसाठीच वापरण्यात येत आहे. त्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीने महानगरपालिकेची निवडणूक लढावी अशी पदाधिकाऱ्यांची मागणी आहे.

भाजपला पराभूत करण्यासाठी ‘विरा’ निवडणुकीच्या आखाड्यात?
कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या; वाचा काय सांगतात डॉ. चक्करवार

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती पुढील येणाऱ्या २०२३च्या निवडणुकी अगोदर भाजपने जाहीर करावी. अन्यथा भाजपचा विदर्भातून पूर्णपणे सफाया करावा यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती पूर्ण ताकदीने प्रचार करेल असेही बैठकीत ठरले. त्यासाठी ९ ऑगस्टला क्रांती दिनापासून होणाऱ्या मोठ्या आंदोलनाचे नियोजन करण्यात येणार आहे.

कोरोना महामारी सुरू झाली तेव्हापासून लोकांचे रोजगार गेले. व्यापार बंद, उद्योग बंदी आदी कारणामुळे लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. लोकांकडे पैसाच उरला नाही. म्हणून कोरोना काळातील विदर्भातील जनतेचे संपूर्ण वीज बिल विदर्भातील सरकारने भरावे, दोनशे युनिट वीज मोफत करावी, शेती पंपाचे वीज बिल माफ करा यासाठी वीज आंदोलन करण्यात येणार असल्याचे राम नेवले यांनी कळविले आहे.

(Vira-will-contest-elections-to-defeat-BJP?)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com