नागपूर : व्हीएनआयटीचा चार संस्थांशी सामंजस्य करार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : व्हीएनआयटीचा चार संस्थांशी सामंजस्य करार

विद्यार्थ्यांना फायदा ; एमगिरीसह मॅटलॅबचा समावेश

नागपूर : व्हीएनआयटीचा चार संस्थांशी सामंजस्य करार

नागपूर : विश्‍वेश्‍वरैय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेने (VNIT)विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे आणि त्यांना आवश्‍यक ते ज्ञान देण्याच्या अनुषंगाने चार संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत. यामध्ये आनंदवन आणि आनंद निकेतन सायन्स कॉलेज, वरोरा, संपूर्ण बांबू केंद्र गावडा, मेळघाट, महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ रूरल इंडस्ट्रीयलायझेशन आणि मॅटलॅबचा समावेश आहे.

व्हीएनआयटीतर्फे करण्यात आलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून प्राध्यापकांची देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि विकास प्रकल्प, विद्यार्थ्यांची इंटर्नशिप(students internship) आणि ग्रामीण विकास, पर्यावरणीय शाश्वतता(Environmental sustainability) आणि आरोग्याशी संबंधित समस्या या क्षेत्रातील सहयोगी कार्यक्रमांचा समावेश आहे. दोन संस्था नॅनो आणि बायोटेक्नॉलॉजी(Biotechnology) क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय संपूर्ण बांबू केंद्राच्या माध्यमातून ऊर्जा, ग्रामीण हस्तकला आणि इतर, जैव आणि पॉलिमर, खादी, रसायने आणि इतर सर्व क्षेत्रांमध्ये संयुक्त संशोधन आणि विकास उपक्रम राबविण्यात येणार आहेत. याशिवाय इतर क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची इंटर्नशिप आणि फॅकल्टी एक्स्चेंज आदी उपक्रमांचा समावेश राहील. यावेळी व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे यांच्यासह डॉ. दिलीप पेशवे आणि सर्व संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top