Weather Update : ढगाळ वातावरणामुळे वाढला गारठा; अवकाळीची शक्यता

जवळपास आठवडाभर गायब राहिलेली थंडी पुन्हा परतली
weather update nagpur cold weather 27 degrees Chance light rain
weather update nagpur cold weather 27 degrees Chance light rainsakal

नागपूर : जवळपास आठवडाभर गायब राहिलेली थंडी पुन्हा परतली आहे. बुधवारी विदर्भातील तापमानात फारसा बदल झाला नसला तरी, ढगाळ वातावरणामुळे हवेत गारठा पसरल्याने हुडहुडी जाणवत आहे. या आठवड्यातही थंडी व बोचरी हवा कायम राहणार असल्याचे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, तो लवकरच चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. या बदलाचा प्रभाव बुधवारी विदर्भात दिसला.

सकाळपासूनच हवेत गारठा पसरल्याने दिवसाही थंडी जाणवली. त्यामुळे नागपूरकरांना दिवसभर स्वेटर्स व जॅकेट्स घालून फिरावे लागले. सायंकाळी थंडी अधिक जाणवली.ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात एक ते तीन अंशांची घट झाली. नागपूरचेही तापमान अडीच अंशांनी घसरून २७.९ अंशांवर आहे. तर किमान तापमान १६.७ अंशांवर स्थिरावले. ढगाळ वातावरणासोबतच अवकाळी पावसाचीही शक्यता असल्याने थंडी व बोचरे वारे आणखी काही दिवस कायम राहणार आहे. हवामान विभागाने १० डिसेंबरनंतर विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाची दाट शक्यता वर्तविली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com