नागपूर : आता लग्नसमारंभातील भोंग्यांवरही विघ्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

DJ

नागपूर : आता लग्नसमारंभातील भोंग्यांवरही विघ्न

नागपूर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भोंगे आंदोलनाचा फटका आता लग्नसमारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वाजणारे भोंगे आणि डिजेनांही बसणार आहे. अशा कार्यक्रमांमध्ये ध्वनी प्रदूषणाची मर्यादा पाळली जाते की नाही, याची तपासणी पोलिसांच्यावतीने केली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या ध्वनी मर्यादेच्या अमंलबजावणीसाठी पोलिसांद्वारे मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी आज दिली.

राज ठाकरे यांनी मशिदीवर वाजणाऱ्या भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. मशिदींमध्ये भोंग्यावरून अजान म्हटले जात असल्याचे दिसल्यास दुप्पट आवाजात हनुमान चालिसाचे पठण करण्यात येईल असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. याकरिता त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटमसुद्धा दिला होता. त्यामुळे पोलिसांचा काम चांगलेच वाढले आहे. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानेच भोंगे काढण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आवाजाची मर्यादासुद्धा ठरवून दिली आहे. नागपूरच्या पोलिस आयुक्तांनी यापुढे जाऊन सर्वच धार्मिक कार्यक्रमांमध्ये भोंगे वाजवायचे असल्यास परवानगी घेणे बंधनकारक केले आहे.

याकरिता सर्व धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि पुजाऱ्यांची त्यांनी बैठक घेऊन सूचना केली. विनापरवानगी भोंगे वाजवल्यास कडक कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. आता या भोंगे आंदोलनाची झळ सर्वांच बसू लागली आहे. पोलिस आयुक्तांनी केवळ धार्मिक स्थळांवरच नव्हे तर लग्नसभारंभांमध्ये वाजणाऱ्या डिजे आणि भोंग्यावरही चाप लावण्याचा निर्णय घेतला आहे.

७४ जणांचे अर्ज

पोलिसांनी भोंग्याबाबत परवानगी घेण्याचे आदेश काढल्याने स्थानिक पोलिस ठाण्यामध्ये परवानगीसाठी गर्दी होत आहे. गुरुवारी एका दिवसात ७४ पेक्षा अधिक जणांनी भोंग्यासाठी परवानगी मागितली असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली.

Web Title: Wedding Ceremonies Cultural Events Blowing Bhonge Djs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top