नागपूर : सरसकट निर्बंध उठवणं महागात पडणार?

unlock
unlock e sakal

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (second wave of corona) नागपूरला सर्वाधिक फटका बसला. एकाचवेळी पाच नवीन स्ट्रेन (five new strain in nagpur) सापडणारे नागपूर हे देशातील एकमेव शहर होते. त्यानंतर लॉकडाउन करण्यात आले. जवळपास एक महिन्याच्या लॉकडाउननंतर परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली. मात्र, अद्यापही शहरात दररोज शंभर-दीडशे कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यातच आता राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात नागपूरचे निर्बंध (unlock nagpur) पूर्णपणे उठविले आहेत. सोमवारपासून हे अनलॉक होणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न, राजकीय सभा यावरही कुठलेही निर्बंध नाहीत. आता कोणाला कोरोनाची भीतीच नाही, याप्रकारे हे पूर्ण नियम उठविणे हे तिसऱ्या लाटेला (third wave of corona) आमंत्रण तर नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. (why state government lift all the restrictions in nagpur at once)

unlock
सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ट्विटर अकाउंटवरील ब्ल्यू टीक हटवलं

काय असणार सुरू?

सर्व दुकाने, बाजारपेठा, सरकारी आणि खासगी कार्यालये, सांस्कृतिक कार्यक्रम, लग्न, राजकीय सभा, सभागृह, चित्रपट गृहे, शॉपिंग मॉल्स, जिम्स, खेळांची मैदाने यासह सर्व सरसकट सुरू राहणार आहे. त्यावर वेळेचं कुठलंही बंधन नाही. लग्नात देखील उपस्थितांची संख्या ठरवून देण्यात आलेली नाही. पण, मंदिर सुरू करण्याबाबत यामध्ये कुठलाही नियम दिलेला आहे.

एप्रिल महिना आठवला की येतो अंगावर काटा -

कोरोनाची पहिली लाट जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत चालली. त्यानंतर राजकीय सभा, ग्रामपंचायत निवडणुका आणि लग्नासाठी काही निर्बंध असतानाही हजारोंच्या उपस्थिती लग्न उरकली. याशिवाय व्हायरस म्युटेशन यामुळे दुसरी लाट आली. कोरोनाचे रुग्ण सापडत असूनही लॉकडाउन लावायला उशिर झाला. लॉकडाउन लागला तोपर्यंत नागपुरातील कोरोनाची रुग्णसंख्या ही आवाक्याबाहेर पोहोचली होती. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात दिवसाला ८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडत होते. परिस्थिती इतकी गंभीर झाली, की रुग्णाला बेड मिळत नव्हते. व्हेंटीलेटर आणि ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाला. दिवसाला १२० जणांचे मृत्यू झाल्याचाही दिवस नागपूरकरांनी पाहिला आहे. सरकारी रुग्णालयांसोबतच खासगी रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये जागा मिळच नव्हती. तर हजारो रुग्ण हे गृहविलगीकरणात उपचार घेत होते. याच काळात औषधांचा काळाबाजार झाला. त्याचाही फटका रुग्णांना बसला. ऑक्सिजनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना वणवण भटकावे लागत होते. त्यानंतर १ एप्रिलला लॉकडाउन घोषित झाला. मात्र, रुग्णसंख्येचा आलेख उंचावत होता. एप्रिल महिन्यात सर्वाधिक रुग्णसंख्या होती. शहराप्रमाणेच ग्रामीण भागातही कोरोनाने थैमान घातले होते. ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात आयात केल्यानंतर शहरातील परिस्थिती हळूहळू सुधारत आली. मे महिन्याच्या शेवटी कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली. पण, आता देखील परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही. अजूनही दररोज दोनशेच्या घरात रुग्ण सापडत आहेत.

शुक्रवारी १९७ नवे रुग्ण, तर १० मृत्यू -

शुक्रवारी जिल्ह्यात १९० बाधित आढळून आले. यात शहरातील संख्या अधिक आहे. शहरात १२० तर ग्रामीणमध्ये ७३ बाधित आढळले. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या ४ लाख ७५ हजार ३९९ पर्यंत पोहोचली. तसेच शुक्रवारी १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यूंची आकडेवारी ही ८ हजार ९४३ पर्यंत पोहोचली आहे. अजूनही रुग्णसंख्या ही शून्यावर आलेली नाही. त्यामुळे सरकारने सरसकट सर्व निर्बंध उठविणे याबाबत शंकाच व्यक्त केली जात आहे.

लसीकरण कमी असताना लॉकडाउन उठविण्याची घाई?

नागपूर शहरात लसीकरणासाठी पात्र असलेली लोकसंख्या ही २४ लाखांच्या घरात आहे. त्यामधून फक्त ६ लाख ८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी ५ लाख १३ हजार जणांना पहिला डोस देण्यात आला आहे, तर फक्त १ लाख ६७ हजार नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही, असे नाही. लसीकरणानंतरही कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यातच इतक्या कमी प्रमाणात लसीकरण झाले असतानाही सरसकट निर्बंध उठविण्याची घाई का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

परत बुमरँग झालं तर...

''सरकारने निर्बंध उठविण्यासाठी घाई केली. माझे अनेक मित्र लंडनला आहेत. त्यांनी हळूहळू निर्बंध उठवले. पण, आपल्याकडे मात्र निर्बंध मागे घेण्याची घाई करण्यात आली. अजूनही आपण दुसऱ्या लाटेतून सावरलो नाही. त्यात तडकाफडकी सर्व निर्बंध उठविण्यात आलेत. गेल्या लाटेत ज्येष्ठ नागरिकांना फटका बसला. मात्र, दुसऱ्या लाटेत आपण कितीतरी तरुण गमावले आहेत. कोरोनाच्या परिस्थितीशी दोन हात करताना आमच्या कितीतरी डॉक्टरांनी जीव गमावला. लग्न, राजकीय सभा हे जीवंत राहिलो तर नंतरही करू शकतो. दुसऱ्या लाटेत पूर्ण जगासमोर आपली नाचक्की झाली. आता तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहोत. हेच निर्बंध हळूहळू उठवायला पाहिजे. दुसऱ्या लाटेत आमच्यासमोर बेड आणि ऑक्सिनजअभावी अनेकांचा जीव गेला. बेड मिळत नसल्याने आमच्या नाकी नऊ आले होते. आता सरकारच्या या निर्णयामुळे परत बुमरँग झालं, तर काय होईल याची भीती आम्हाला वाटते. तिसरी लाट आलीच तर शेवटी दोन ते तीन महिने एकावेळी लॉकडाउन करावे लागेल. त्यापेक्षा हळूहळू लॉकडाउन उठविणे हे सोयीस्कर ठरले असते.''

- डॉ. उदय बोधनकर, एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर, कोम्हाड (COMHAD, UK)आणि माजी सदस्य, सल्लागार समिती, भारत सरकार

डॉ. उदय बोधनकर, एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर, कोम्हाड (COMHAD, UK)आणि माजी सदस्य, सल्लागार समिती, भारत सरकार
डॉ. उदय बोधनकर, एक्झीक्युटीव्ह डायरेक्टर, कोम्हाड (COMHAD, UK)आणि माजी सदस्य, सल्लागार समिती, भारत सरकारe sakal

सरकारचा निर्णय चुकीचा -

''घाईघाईमध्ये सर्वच्या सर्व निर्बंध उठवायची काहीही गरज नव्हती. टप्प्याटप्प्यानं हे जर उघडलं असतं, तर रुग्णसंख्या आटोक्यात राहण्यात मदत होईल. हे वर्ष तरी कोरोनासोबत घालवायचं आहे. त्यामुळे एकावेळी सरसकट निर्बंध उठविणे हे निश्चितच तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. लोक एकदम बाहेर पडतील. त्यामुळे टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उघडले असते, काही प्रमाणात फायदा झाला असता. लग्नात हजारो वऱ्हाडी येतात. नागरीक ऐकत नाहीत. त्यामुळे सरकारचा निर्णय चुकीचा आहे.''

- संदीप जोशी, माजी महापौर, नागपूर

- संदीप जोशी, माजी महापौर, नागपूर
- संदीप जोशी, माजी महापौर, नागपूरe sakal

वेळेची मर्यादा घालून निर्बंध उठविणे हाच उपाय -

''सरकारने उठविलेले निर्बंध हे तिसऱ्या लाटेला आमंत्रण आहे. कमीत कमी ऑगस्ट महिन्यापर्यंत तरी वेळेची मर्यादा घालून सर्व सुरू ठेवणे अपेक्षित होते. सर्व सुरू करायला पाहिजे होतं, पण काही प्रमाणात निर्बंध घालून. आता ४५ वर्षांच्या नागरिकांच लसीकरण झालं. पण घरातील इतर व्यक्तींचं लसीकरण झालेलं नाही. निर्बंध असतानाही जनता ऐकत नाही. आता निर्बंध उठविल्यानंतर नागरीक घराबाहेर पडतील. मजूर, हातावर कमावून पोट भरणारे लोक आहेत. पण, त्यांना सरकारने मदत करायला पाहिजे आणि त्यांची दुकानं ही वेळेची मर्यादा घालून सुरू करण्यास परवानगी द्यायला पाहिजे. लॉकडाउन लावणे आणि लगेच मागे घेणे हे धोकादायक ठरू शकतं.''

- प्रशांत पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्ष, जय जवान-जय किसना संघटना

प्रशांत पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्ष, जय जवान-जय किसना संघटना
प्रशांत पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्ष, जय जवान-जय किसना संघटनाtwitter

लोकांनी तिसऱ्या लाटेची मानसिकता ठेवावी -

''राज्य शासनाचा हा निर्णय आततायीपणाचा आहे. काही दिवस वेळेची मर्यादा घालून सर्व सुरू करता आलं असतं किंवा एक दिवसाआड काही दुकानांना परवानगी देता आली असती. सर्वात महत्वाचे म्हणजे निर्बंध असताना लसीकरण मोहीम ही धडक्यात सुरू ठेवणे गरजेचे होते. लसीकरण पूर्णपणे झालेले नसताना सरकारने सरसकट निर्बंध उठविले म्हणजे लोकांनी आता तिसऱ्या लाटेची मानसिकता ठेवायला पाहिजे. राज्य शासनाने कोरोनाला पोरखेळ समजू नये. तिसरी वेळ येणार आहे. पण ती शेवटची असेल का याची काहीच शाश्वती नाही. सरकारने ही तयार केलीय की, आम्ही आपलं बघतो; लोकांनी आपलं बघून घ्यावं, अशारितीने सरकारने हे निर्बंध उठविले आहेत. घाईघाईत लॉकडाउन उठविण्याचा निर्णय शासनाच्या अंगलट येईल.''

- नितीन रोंघे, संयोजक, महाविदर्भ जनजागरण

नितीन रोंघे, संयोजक, महाविदर्भ जनजागरण
नितीन रोंघे, संयोजक, महाविदर्भ जनजागरणe sakal

दरम्यान, राज्य शासनाने हे निर्बंध लागू केले असले, तरी प्रत्येक महापालिकेला स्वतंत्र युनिट म्हणून घोषित केले आहे. त्यात आता महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com