सिलिंडर डोक्यावर घेत महिला काँग्रेसचे आंदोलन

इंधन दरवाढीचा निषेध, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
Women Congress agitation carrying cylinder heads Protest against fuel price hike Modi government nagpur
Women Congress agitation carrying cylinder heads Protest against fuel price hike Modi government nagpur sakal

नागपूर : इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नॅश अली यांनी डोक्यावर सिलिंडर घेऊन आंदोलन केले. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून गेला होता. काँग्रेसच्या कार्यकाळात सिलिंडरच्या दरात एक रुपयानेही वाढ झाली असता भाजप चौकाचौकात आंदोलन करीत होते. हेमा मालिनी, श्रुती इराणी चौकात बसून स्वयंपाक करीत होत्या. आता त्यांच्याच कार्यकाळात सिलिंडर हजार रुपयाला मिळतो. पेट्रोल १२० रुपये लिटरने विकल्या जात आहे. सर्वसामान्यांची जगणे मुश्कील झाले असतानाही मोदी सरकार गप्प असल्याचा आरोप नॅश अली यांनी केला.

अग्रसेन चौकातील एचपी पेट्रोल पंपसमोर आंदोलन करण्यात आले. यात रमण पैगवार, रवी गौर, गोपाल पट्टम, मोतीराम मोहाडीकर, रवी पौनीकर, रमेश पुणेकर, प्रवीण गवरे, पिंटू बागडी, महेश श्रीवास, राजा शेख यांच्यासह रिचा जैन, नफीसा अहमद, विजया धोटे, रेखा काटोल, गीता जडगावकर, संगीता बनाफर, प्रणीत गायकवाड, अंजना मडावी, नंदा देशमुख, लीना कटारे, रोशनी पराते, शीतल शुक्ला, वंदना चाहांदे, अल्का बिनकर, कल्पना द्रोणकर, अर्चना भोसले, अर्चना कापसे, अरुणा चौधरी, बबिता वालदे, उज्ज्वला नखाते, हिरा नंदनवार, राणी पंचम, कालिंदी नहाते, कल्पना जोगे, कल्याणी ठाकरे, कांचन शंभरकर, ममता तोमर, माया धापोडकर, वीणा बेलगे, वंदना रोटकर, सुनीता कोचे, सुहासी टेमभरे यांच्यासह शेकडो माहिला सहभागी झाल्या होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com