पुरुषांसह आता महिलाही चोरी करण्यात अव्वल; वाहनाची बॅटरी चोरण्यात सहभाग  

women stole batteries of vehicles in Amravati
women stole batteries of vehicles in Amravati

अमरावती : शहरात घरासमोर किंवा पार्किंगच्या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांच्या बॅटऱ्या चोरीत चक्क दोन महिलांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यात दोघींसह एक ऑटोचालक अशा तिघांना पोलिसांनी अटक केली.

प्रमोद गोपाळराव डाखोरे (वय 49, रा. संतोषीमाता नगर) व दोन महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी दिली. या त्रिकुटाने राजापेठ हद्दीत चार ठिकाणी बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 41 हजार 800 रुपये किंमतीच्या बॅटऱ्या आणि गुन्ह्यात वापरलेला ऑटो (एमएच 27 बी डब्ल्यू. 3089) असा एक लाख 61 हजार 800 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. 

त्या दोघींसह ऑटोचालक प्रमोद या तिघांविरुद्ध राजापेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. वाहनांच्या बॅटऱ्या व इतर ठिकाणी भंगार चोरीची कबुली या महिलांनी दिली. शहरातील राजापेठ, गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीत वाहनांच्या बॅटऱ्या चोरीचे गुन्हे दाखल आहेत. ऑटोचालक डाखोरे यांची गेल्या अनेक वर्षांपासून या दोन्ही महिलांसोबत ओळख आहे. ते दिवसा अशा वाहनांची किंवा बांधकामाच्या ठिकाणांची रेकी करीत होते. त्यानंतर रात्रीला किंवा पहाटे चोरी व्हायची.  

सीसीटीव्ही फुटेज महत्त्वाचे ठरले

वाहनांच्या बॅटऱ्या चोरी करताना एका ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज राजापेठ पोलिसांच्या हाती लागले. सदर ऑटोने या महिलांना वाहनाजवळ सोडून दिल्या जाते. त्यानंतर त्याच ऑटोत बॅटऱ्या टाकून महिला दहा ते पंधरा मिनिटांनी तेथून निघून जातात.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com