HR च्या छळाला कंटाळून कामगाराची आत्महत्या, सुसाईड नोटवरून गुन्हा दाखल

 Suicide
Suicidesakal media

नागपूर : कंपनीचा मॅनेजर आणि दोन्ही एचआरने केलेल्या मानसिक छळाला कंटाळून कामगाराने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना जरीपटक्यात (Jaripatka nagpur) उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी कंपनीचा मॅनेजर आणि दोन्ही एचआरविरुद्ध गुन्हा दाखल (nagpur crime) करून एकाला अटक केली. प्रकाश शिवदास वाघमारे (५३, श्रावस्तीनगर) असे मृताचे नाव आहे.

 Suicide
तमाशा कलाकाराचा मुलगा MPSC उत्तीर्ण, पण मुलाखतीपूर्वीच मृत्यूशी संघर्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश वाघमारे बुटीबोरीतील एएमसीएल मशिनरी लिमिटेड कंपनीत वेल्डर पदावर कार्यरत होते. २०१५ मध्ये प्रकाशवर कंपनीचे मॅनेजर उत्तम जनार्दन ताजणे (५६, अलंकारनगर, मानेवाडा रोड) आणि एचआर नवनीत भट्टल यांनी चोरीचा आरोप लावला होता. त्यानंतर प्रकाश यांना नोकरीवरून काढले. प्रकाश यांनी कंपनीविरुद्ध कामगार न्यायालयात दाद मागितली होती. पाच वर्षांच्या लढाईनंतर कामगार न्यायालयाने प्रकाश यांच्या बाजूने निर्णय देत कामावर पूर्ववत घेण्याचा आदेश दिला होता. या आदेशाला कंपनीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर न घेता कंपनीचे एच आर आणि मॅनेजरने प्रकाश यांना त्रस्त केले. त्यांच्या त्रासाला कंटाळून ५ सप्टेंबर २०२१ ला रात्री साडेअकरा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एचआर आणि मॅनेजरच्या नावाचा उल्लेख करून चिठ्ठी लिहून ठेवली. त्यामुळे प्रकाश यांचा मुलगा इशांत वाघमारे याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी उत्तम ताजणे याला अटक केली असून, नवनीत भट्टल याचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com