नागपुरात 'बॅनर वॉर', युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविलं

नागपुरात 'बॅनर वॉर', युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविलं

नागपूर : सध्या नागपुरात काँग्रेस (congress) आणि भाजपचा (BJP) बॅनर वॉर सुरू आहे. यातच काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस गिरीश पांडव (girish pandav) यांच्या वाढदिवसाचे बॅनर महापालिकेने काढले. त्याविरोधात युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी महापालिका (nagpur municipal corporation) मुख्यालयात आंदोलन केले. त्यांनी महापालिका आयुक्तांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडविलं. (youth congress agitation at nagpur municipal corporation)

नागपुरात 'बॅनर वॉर', युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडविलं
अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

नागपूर महापालिका निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. भाजपकडूनही पूर्ण तयारी केली जात आहे, तर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील निवडणुकीसाठी चांगलेच सक्रीय झाले आहेत. सध्या शहरात काँग्रेस आणि भाजपचे झेंड आणि बॅनर शहरात लावण्यात आले आहेत. विशेषतः युवक काँग्रेसकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच काँग्रेसकडून प्रदेश सरचिणीस गिरीश पांडव यांच्या वाढदिवसाचे बॅनर शहरात लावण्यात आले. तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. मात्र, महापालिकेने गिरीश पांडव यांच्या वाढदिवसाचे बॅनर काढले. त्यामुळे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका मुख्यालयात आंदोलन करत रोष व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडविलं.

दरम्यान, त्याचठिकाणी लागलेले भाजपचे बॅनर काढले नाही आणि काँग्रेसचे बॅनर हटविण्यात आले. याबाबत त्यांना विचारले असता हे प्लॅस्टीकचे बॅनर असल्याचे महापालिका आयुक्त म्हणाले. महापालिका आयुक्त राधाकृष्ण बी हे भाजपचे प्रचारक आहेत, असा आरोप कार्यकर्त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com