महाराजबागेत उद्यापासून मॉर्निंग वॉक बंद

महाराजबागेत दोन दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या वादामुळे ९ एप्रिलपासून नागरिकांचे सकाळी फिरणे बंद करण्याचा निर्णय
Zoo Act Morning walk in Maharajbag closed from tomorrow nagpur
Zoo Act Morning walk in Maharajbag closed from tomorrow nagpursakal

नागपूर : महाराजबागेत दोन दिवसांपूर्वी दोन गटात झालेल्या वादामुळे ९ एप्रिलपासून नागरिकांचे सकाळी फिरणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय फिरण्यास येणारे अनेक नागरिक येथील प्राण्यांना अनावश्यक खाद्यपदार्थ देत असल्याने महाराजबाग प्रशासनाने फिरण्यावर बंदी आणली.

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने महाराजबागेला प्राणीसंग्रहालय कायद्यानुसार मान्यता दिली आहे. त्यानुसार देशात कुठल्याही प्राणीसंग्रहालयात मॉर्निंग वॉकला परवानगी नाही. महाराजबागेत फिरण्यास येणाऱ्यामुळे प्राण्यांनाही त्रास होत आहे. ५ एप्रिलला येथे फिरण्यास येणाऱ्या दोन गटात चांगलाच वाद झाला. याबाबत सीताबर्डी पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने महाराजबाग प्रशासनानने ९ एप्रिलपासून नागरिकांचे सकाळी फिरणे बंद करण्याचा निर्णय घेतला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com