नागपूर : दुबई ‘रिटर्न’ तरुणाला ओमिक्रॉनची बाधा

शहरातील दुसरा रुग्ण; प्रशासन सतर्क
Omicron variant
Omicron variantSakal media
Summary

शहरातील दुसरा रुग्ण; प्रशासन सतर्क

नागपूर : कोरोनाचा नवीन व्हेरिएंट(corona new varient) असलेल्या ओमिक्रॉनने(omicron) आता हळूहळू पाय पसरविण्यास सुरुवात केली असून दुबई(dubai) येथून आलेल्या प्रवाशालाही ओमिक्रॉनची बाधा झाली आहे. या विषाणुची बाधा झालेला शहरातील दुसरा रुग्ण असून यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. शनिवारी (ता.१८) रोजी दुबई येथून २१ वर्षीय तरूण दिल्लीमार्गे नागपुरात उतरला. विमानतळावरच (airport)टेस्ट केल्यानंतर तो पॉझिटिव्ह आढळला. ओमिक्रॉनची चाचणीसाठी त्याचे नमुने जिनोम सिक्वेंसिंगसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविले होते. या नमुण्यांचा अहवाल आज (ता. २३) प्राप्त झाला असून त्याला नव्या व्हेरिएंट बाधा झाली आहे.

धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या नरेंद्र नगर येथील रहिवासी असलेल्या युवकाला अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (Aims) मध्ये स्वतंत्र खोलीत येथील वैद्यकीय पथकाच्या निरीक्षणात उपचार सुरु आहेत. या युवकाची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय चिलकर यांनी सांगितले. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दहाव्या दिवशी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. अहवाल निगेटिव्ह आल्यास त्याला सुटी देण्यात येईल. मात्र, त्याला काही दिवस घरीच विलगीकरणात राहावे लागणार आहे.

Omicron variant
राज्यात संचारबंदी? महाविकास आघाडीतील मोठ्या मंत्र्याचे संकेत

संपर्कातील ५२ जणांचेही अहवाल निगेटिव्ह

सदर २१ वर्षीय विदेश प्रवासाची पार्श्वभूमि असलेला तरुण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आल्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून त्याच्या संपर्कातील कुटुंबिय व परिसरातील नागरिक अशा जवळपास ५२ लोकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. परंतु यापैकी एकाचाही अहवाल कोरोनाबाधित आढळला नाही.

Omicron variant
महाविकास आघाडीतील दोन मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

पश्चिमेनंतर पूर्व आफ्रिकेतील तरुणालाही कोरोना

बुधवारी पूर्व पूर्व आफ्रिकेतून आलेल्या तरुणालाही कोरोनाची बाधा झाली आहे. दुसऱ्या चाचणीतही कोरोना कायम असल्याने त्याला एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरुवारी या वक्तीचे नमूने जिनोम सिक्वेंसिंगकरिता पुण्याच्या प्रयोगशाळेकडून पाठविण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com