नागपूरकरांच्या विदेशवाऱ्या वाढताहेत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

नागपूर - उन्हाळा म्हटला की शाळेला सुटी आणि सुटी म्हटली की मामाचे गाव, ही संकल्पना केव्हाच नष्ट झाली. आता सुटी म्हटली की थंड हवेचे ठिकाण हे समीकरण हिट झाले असून, नागपूरकरांनी पर्यटनासाठी देशाअंतर्गत तसेच विदेशी स्थळांना पसंती दर्शविली आहे. ‘ट्रॅव्हल ॲण्ड टुरिझम’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार नागपूरकरांच्या विदेशवाऱ्या काही वर्षांत वाढल्या आहेत.

उन्हाळ्यातील पर्यटन या विषयाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी सर्वेक्षण केले. यामध्ये देशाअंतर्गत, देशाबाहेरील तसेच महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना नागपूरकरांची पसंती आदी मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. सर्वेक्षणानुसार या उन्हाळ्यात पर्यटनासाठी कुठे जायचे नियोजन असेल, तर निश्‍चितच दक्षिण भारताची निवड करा. प्रत्येक वर्षी देश-विदेशातील लाखो पर्यटक येथे येतात. तुम्हाला उन्हाळ्याची सुटी शांत आणि निसर्गरम्य वातावरणात घालावयाची असेल, तर त्यासाठी दक्षिणेतील देवबाग बीच उत्तम पर्याय राहील. येथे हार्सले टेकड्यांच्या नैसर्गिक दृश्‍यांचा आनंद घेता येईल. या व्यतिरिक्त शहरातील गर्दीपासून दूर असलेले मुदूमलाई पार्क आणि कोची बंदरालाही भेट देता येईल. दक्षिण भारतात ते सर्व आहे जे एका पर्यटकाला हवे असते, असे या सर्वेक्षणाचे म्हणणे आहे.

दार्जिलिंग, उटी ही थंड हवेची ठिकाणे आजही नागपूरकरांच्या ‘फेव्हरेट’ आहेत. अमेरिका, सिंगापूर, बॅंकॉक, पटाया, सेशल्स, नेपाळ, श्रीलंका, युरोप येथे जाण्याकडे पर्यटकांचा कल दिसून येतोय. सर्वेक्षणानुसार ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या पासपोर्ट तयार करणे शक्‍य झाल्याच्या कारणाचादेखील वाढलेल्या विदेशवारींमध्ये हात आहे. बजेटचा विचार करता मध्यमवर्गीयांनी राज्यातील माथेरान, कोकण याशिवाय गणपतीपुळे, सिंहगड, जंजिरा गड, महाबळेश्‍वर यांना पसंती दर्शविली आहे. 

पर्यटकांची आवड
महाराष्ट्रात

 कोकण
 जंजिरा गड
 महाबळेश्‍वर

देशात
केरळ
 उटी
 दार्जिलिंग
विदेशात
 सिंगापूर
 सेशल्स
 बॅंकॉक

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur's citizen foreign tour