'पटोलेंचा अहंकार मोडून काढा'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

भंडारा - पालघरमध्ये खासदाराचे निधन झाले म्हणून पोटनिवडणूक लागली आहे; पण भंडारा-गोंदियात काय झाले? खासदाराने अहंकारामुळेच राजीनामा दिल्याने ही निवडणूक लादली गेली, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोहाडी येथील जाहीर सभेत बोलताना केली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 'पटोले यांनी 2009 मध्येही आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्या वेळी लोकांचे सहकार्य मिळाले असेलही. या वेळी त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा दिलेला राजीनामा शेतकऱ्यांसाठी किंवा मतदारांच्या फायद्यासाठी नव्हता. तो स्वार्थासाठी होता. त्यामुळे या वेळी लोकांच्या मनात या राजीनाम्याबद्दल तीव्र आक्रोश आहे. जनतेचा हा आक्रोश मतपेटीतून दिसेल.''

Web Title: nana patole devendra fadnavis politics