नांदेड: विद्यापीठातील प्रवेश प्रक्रियेच्या तारखेत वाढ

प्रल्हाद कांबळे
सोमवार, 18 जून 2018

नांदेड - येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिसरातील संकुल आणि लातूर उपकेंद्र येथील पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. याआधी १५ जून ही नोंदणी करण्याची शेवटची तारीख देण्यात आली होती ती आता २८ जून करण्यात आली आहे.

२८ जून नंतरचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. ३० जून रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. पहिल्या गुणवत्ता यादीमधील विद्यार्थ्यांनी ०४ जुलै पर्यंत आपले प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. ०५ जुलै रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून त्यामधील विद्यार्थ्यांनी ०७ जुलैपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावयाचे आहेत. ०९ जुलै ही स्पॉट अॅडमीशन आणि प्रवेश घेण्याची शेवटची तारीख आहे. ०९ जुलैपासून नियमितपणे वर्ग सुरु होणार असून, पात्रता अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत दाखल करता येणार आहेत, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव यांनी कळविले आहे.

Web Title: Nanded: increase in the date of admission in the university