माहूर गडावरील श्री रेणुकादेवीचा नवरात्रोत्सव मोठया उत्साहात

बालाजी कोंडे
सोमवार, 25 सप्टेंबर 2017

माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणूकादेवीचा नवरात्र उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

माहूर : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणूकादेवीचा नवरात्र उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात येत आहे.

रविवारी ललिता पंचमी निमित्त प्रख्यात गायक श्रीधर फडके यांनी भक्ती गीत व  भावगीताचा बहारदार कार्यक्रम सादर करून भाविकांना मंत्रमुग्ध केले. भक्ती संगीत कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन संस्थानचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुधीर कुलकर्णी यांनी केले. यावेळी संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, भवाणीदास भोपी, समीर भोपी, श्रीपाद भोपी, आशिष जोशी, विनायकराव फांदाडे, व्यवस्थापक योगेश साबळे, सहाय्यक व्यवस्थापक नितीन गेडाम यांच्यासह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते.

ललिता पंचमीस श्री रेणुकादेवीच्या दरबारात ग्रामीण भागातील अनेक नवोदीत कलावंतानी आपली गायन - कला सादर करून श्री रेणूकादेवीचे आशीर्वाद घेतले. कार्यक्रमाचे संचलन कृतिका सिध्देश्वर वरणगावकर यांनी केले.

Web Title: nanded news navratri festival mahur renuka devi