नांदूऱ्याजवळ स्विफ्ट कार व ट्रकची समोरासमोर धडक ; 2 जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

अपघात घडताच नांदुरा शहरातील ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर आपल्या सहकाऱ्यांसह अॅम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले व वेळीच जखमींना रुग्णालायात दाखल करण्यात आले.

नांदूरा : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वरील मलकापूर ते नांदुरा दरम्यानची अखंडित अपघाताची मालिका 11 व्या दिवशी सुरूच असून आज एप्रिल सकाळी साडेदहा वाजता ट्रक व स्विफ्ट डिजायर कार समोरासमोर धडकल्याने स्विफ्टमधील दोन जण जागीच ठार झाले असून, त्यातील ७ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असून, त्यांना अकोला येथे पुढील उपचारार्थ भरती करण्यात आले आहे.

जखमींमध्ये दोन चिमुकल्यांचाही समावेश आहे. अपघात एवढा भीषण होता की गाडी नेमकी मलकापूर की नांदूऱ्याकडे जात होती. मूर्तिजापूर येथे उद्याचा साखरपुड्याचा कार्यक्रम असल्याने मालेगाव येथील कुटुंबीय आपल्या स्विफ्ट डिजायर कार एम.एच.४०-एसी ५३८० ने मूर्तिजापूरकडे जात असताना नांदुरा जवळील हॉटेल प्रियंकाजवळ आले असताना समोरून येणाऱ्या ट्रक क्र.एम.एच.२७ बीएफ-५६९५ ने समोरासमोर धडक दिल्याने कारमधील ड्रायव्हर साबीर सलीम अन्सारी वय ३५ व  शिफा अख्तर अन्सारी वय ९ वर्ष हे जागीच ठार तर रुबीनाबी शेख अख्तर वय३२,सुमिया साबीर वय ३५,जावेद अख्तर वय १४,सोनू अख्तर वय१७ व इतर तीन जखमी झाले. यापैकी सोनू अख्तर व इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला पाठविण्यात आले.

अपघात घडताच नांदुरा शहरातील ओमसाई फाउंडेशनचे अध्यक्ष विलास निंबोळकर आपल्या सहकाऱ्यांसह अॅम्ब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल झाले व वेळीच जखमींना रुग्णालायात दाखल करण्यात आले. तसेच नांदुरा नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांनी स्वतः जखमींना उचलून मदत केली. गेल्या १० दिवसात मलकापूर ते नांदुरा दरम्यानच्या महामार्ग अपघात मालिकेत आतापर्यत वेगवेगळ्या अपघातात ६ प्रवासी ठार तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले.

Web Title: Nandur Swift Car Truck Accident 2 dead