शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील व पोलिसांमध्ये फ्रिस्टाइल

विरेंद्रसिंह राजपूत
शुक्रवार, 8 सप्टेंबर 2017

नांदुरा(बुलडाणा) - राष्ट्रीय महामार्गावर नांदुरा शहरातील जुन्या बसस्टँडजवळ शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता पाटील यांच्या खाजगी वाहनाला धक्का लागल्याच्या कारणावरून ट्रकचालक व पितापुत्रात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे या मार्गावर वाहतूक विस्कळीत झाल्याचे पाहून पोलिसांनी त्यात हस्तक्षेप केला असता पोलीस व दत्ता पाटील पितापुत्रात फ्रीस्टाइल झाल्याची घटना आज दुपारी घडली.याप्रकरणी परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख दत्ता पाटील हे आपल्या खाजगी वाहनातून मुलासह नांदुऱ्याकडे येत होते.दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर जुन्या बसस्टँडजवळ एका ट्रकने त्यांच्या खाजगी वाहनाला धडक दिली.चालक दत्ता पाटील यांचे  पुत्र शुभम पाटील यांचा ट्रक चालकासोबत वाद होत असताना वाहतूक खोळंबली.त्यावेळी वाहतूक पोलिसांनी घटनास्थळ गाठले व वाहतूक सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असताना शुभम पाटील व दत्ता पाटील यांची पोलिसासोबत शाब्दिक चकमक झाली.यावेळी फ्री स्टाइल ची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी लाठीचार्ज केला.ज्यामध्ये शुभम पाटील व पोलीस कर्मचारी पराग कोलते जखमी झाले.याप्रकरणी पोलिसांनी जिल्हाप्रमुख दत्ता पाटील,त्यांचा मुलगा शुभम पाटील,पवन पाटील व ड्रायव्हर/p a यांच्यावर कलम ३५३,३३२,२९४,५०६,३४भादवि अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.तर ट्रक चालकांविरुद्ध कलम २७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींना कोर्टात दाखल करण्यात आले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

Web Title: nandura vidarbha news fighting with datta patil & police