पंतप्रधानांनी केले दीक्षाभूमीवर ध्यान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली
नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट देत संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ते 20 मिनिटे दीक्षाभूमीवर होते. या वेळी त्यांनी पाच मिनिटे ध्यानसाधनाही केली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली
नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट देत संविधाननिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ते 20 मिनिटे दीक्षाभूमीवर होते. या वेळी त्यांनी पाच मिनिटे ध्यानसाधनाही केली.

राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार कृपाल तुमाने या वेळी उपस्थित होते. सकाळी 11.05 वाजता पंतप्रधानांचे दीक्षाभूमीवर आगमन झाले. वाहनातून खाली उतरताच त्यांनी बोधीवृक्षाची पाहणी केली. स्तुपाच्या आत प्रवेश केला. डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण करून परिक्रमा केली. भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण केल्यानंतर मोदी यांनी पाच मिनिटे ध्यान केले. दीक्षाभूमी स्वागत समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई व सदानंद फुलझेले यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. बुद्धवंदनेनंतर मोदी यांनी दीक्षाभूमी स्तुपाची पाहणी केली. परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यांना पुष्पार्पण, अभिवादन करून त्यांनी कोराडीकडे प्रस्थान केले.

मोदींच्या दौऱ्याच्यावेळी विदर्भ राज्य आघाडीच्या कार्यकर्त्यांनी चित्रकला महाविद्यालयाजवळ विदर्भ राज्याबाबतचे "पोस्टर' घेऊन निदर्शने केली.

पंतप्रधानांचा संदेश
दीक्षाभूमी में आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर को श्रद्धांजली देने का सौभाग्य प्राप्त कर, मुझे अत्यंत प्रसन्नता की अनुभूती हो रही हैं. भारतीय संविधान के शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर की यह दीक्षाभूमी निश्‍चित ही सदैव करोडो भारतीयों को प्रेरणा देती रहेगी.

Web Title: narendra modi in nagpur dikshabhumi