पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपूर दौऱ्यावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 एप्रिल 2017

दीक्षाभूमीवरील विशेष टपाल तिकिटाचे होणार लोकार्पण 

नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. 14) नागपूर दौऱ्यावर येत असून, ते तीन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी' या विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन होणार आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त प्रशासकीय आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. 

पंतप्रधान मोदी यांचे उद्या सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होईल. विमानतळावरून ते थेट दीक्षाभूमी येथे जातील. सकाळी 11 वाजता ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125व्या जयंती वर्ष समारंभास उपस्थित राहतील. दीक्षाभूमी स्तुपाला भेट देऊन, आदरांजली वाहतील. त्यानंतर मोदी कोराडी थर्मल पॉवर स्टेशन येथील कार्यक्रमासाठी जातील. तेथे सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी त्यांच्या हस्ते तीन नव्या वीजनिर्मिती संचांचे लोकार्पण होईल. 

त्यानंतर दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी मानकापूर येथील क्रीडासंकुलात त्यांच्या हस्ते शासनाच्या विविध प्रकल्पांचा प्रारंभ होईल. त्यांच्या उपस्थितीत "डिजिधन' मेळाव्याचा समारोप होईल. याच कार्यक्रमात "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी' या विशेष टपाल तिकिटाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. येथे मोदी उपस्थितांना मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजून 10 मिनिटांनी ते विशेष विमानाने दिल्लीला रवाना होतील.

Web Title: narendra modi nagpur tour