जहाल नक्षलवादी नर्मदाक्काला न्यायालयीन कोठडी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असलेली जहाल नक्षलवादी नर्मदाक्का हिला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याने तिला नागापूर येथील रुग्णालयात भरती केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दंडकारण्य स्पेशल कमिटीची सदस्य असलेली नर्मदाक्का व तिचा पती किरण कुमार यांना गडचिरोली पोलिसांनी गेल्या आठवड्यात सिरोंचा येथून अटक केली होती.

एके-47 हे शस्त्र वापरणारी नर्मदाक्का हिच्याच नेतृत्वात जिल्ह्यातील बहुतांश नक्षली आजवर काम करीत होते. जिल्ह्यात आजवर झालेल्या जाळपोळीच्या घटना व हत्यांची मास्टरमाइंड नर्मदाक्का हीच होती. औषधोपचार करून परतत असताना पोलिसांनी दोघांनाही अटक केल्याने नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे. अटकेनंतर पोलिसांनी नर्मदाक्काकडून नक्षल संघटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या हाती फारसे काही लागले नसल्याचे समजते. त्यानंतर आज दोघांनाही न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, प्रकृती बरी नसल्याने पोलिसांनी प्रथम तिला गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात भरती केले; त्यानंतर दुपारी नागपूर येथे हलवल्याची माहिती आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: narmadakka sent to judicial custody