खाद्यतेलाच्या कंपनीवर पोलिसांचा छापा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 मार्च 2018

नागपूर - गुन्हे शाखा आणि एफडीआयने इतवारीतील एका खाद्यतेल बनविणाऱ्या कंपनीवर छापा घातला. पोलिसांनी 1 लाख 70 हजार रुपयांचे तेल जप्त केले आहे. अन्न व औषधी प्रशासन विभागाला (एफडीआय) पोलिसांनी सूचना दिली. तेलाचे गोदाम सील केल्याची माहिती पोलिससूत्रांनी दिली. या कारवाईबाबत पोलिसांनी अतिशय गोपनीयता बाळगल्यामुळे कारवाईवर संशय निर्माण झाला आहे. 

लकडगंज परिसरातील आंबेडकर चौक येथील जेठानंद खंडवानी यांच्या जेठानंद कंपनी येथील खाद्यतेलाच्या रिपॅकरमध्ये भेसळ होत असल्याची गुप्त सूचना एफडीएचे विनोद धवड आणि गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी जेठानंद कंपनी येथे छापा टाकला. रिफाइन सोयाबीन व कॉटन सील तेलांची तपासणी करून त्यांचे 3 नमुने काढून घेतले. सोबत संशयाच्या आधारावर तेथून 1 लाख 70 हजारांचा खाद्यतेलाचा साठा जप्त केला. जप्त केलेले खाद्यतेलाचे नमुने हे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. तेलाच्या तपासणीच्या अहवाल प्राप्त झाल्यानंतर भेसळीच्या प्रमाणाबाबत योग्य माहिती देण्यात येणार आहे. या कारवाईमुळे तेल विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वीही पोलिसांनी भेसळयुक्‍त खाद्यतेल तयार करणाऱ्या कंपन्यांवर छापे घातले होते. मात्र, एवढी गोपनियता बाळगण्यात आली नव्हती. त्यामुळे छापा घालणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे. 

Web Title: nashik news Police raid on oil company FDA