समृद्धी महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांची उद्या परिषद; पवारांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 जून 2017

गेल्या आठवड्यात मुबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात या समृद्धी महामार्ग प्रकल्पाने बाधित होणाऱ्या दहा जिल्ह्यातील पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांकडून  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.

नाशिक : प्रस्तावित समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबईदरम्यान प्रकल्प बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची शेतकरी परिषद माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी १२ जून रोजी औरंगाबाद येथे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात मुबई येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात या समृद्धी महामार्ग प्रकल्पाने बाधित होणाऱ्या दहा जिल्ह्यातील पक्षाच्या जिल्ह्याध्यक्षांकडून  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या.

दहा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांची शेतकरी परिषद सोमवार १२ जून रोजी दुपारी १ वाजता संत तुकाराम महाराज सभागृह, सिडको, औरंगाबाद येथे होणार आहे. तरी  नाशिक जिल्यातील इगतपुरी व सिन्नर या तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहनही जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार यांनी केले आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
मोदींचे कोट विकले, तरी कर्जमाफी होईल: संजय राऊत
लोणावळ्यातील दुहेरी खून चोरीच्या उद्देशाने; दोघांना अटक
स्वामिनाथन आयोगाच्या प्रमुख शिफारशी

अंबाबाईच्या घागरा-चोली रुपातील पुजेमुळे शिवसेनेचे आंदोलन​
बीड: धानोराजवळ खासगी बसला अपघात; 12 ठार
गेवराई: बोअरवेलची गाडी पलटी होऊन दोन जण चिरडले

राजू शेट्टींवर सोडलेले सदाभाऊ अस्त्र मुख्यमंत्र्यांवर बुमरॅंग झाले !​
इंग्लंडच्या विजयाने बांगलादेश उपांत्य फेरीत; ऑस्ट्रेलियाचे पॅकअप​
आले ट्रम्प यांच्या मना...
शेतकरी आंदोलनाचं आक्रीत (आदिनाथ चव्हाण)​
यादव म्हणजेच मराठे? (सदानंद मोरे)​

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

Web Title: nashik news samruddhi mahamarg farmers sharad pawar