"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज 

"भाजप'चे राष्ट्रीय अधिवेशन; आणखी तीन हजार खोल्यांची गरज 

नागपूर - भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आघाडीचे राष्ट्रीय अधिवेशन 18, 19 आणि 20 जानेवारीला नागपुरात होत आहे. यात सहभागी होण्यासाठी देशभरातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते येणार आहेत. त्यांच्याकरिता सर्व तारांकित, सामान्य बजेट हॉटेल्स, सर्व्हिस अपार्टमेंट हाउसफुल्ल आहेत. या कालावधीत प्रीमियम हॉटेलच्या संचालकांनी रूमच्या दरात वाढ केली आहे. मात्र, सर्व्हिस अपार्टमेंट, सामान्य बजेट हॉटेल्सचे दर कायम आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर जानेवारी महिन्यात पुन्हा हॉटेल्सला "अच्छे दिन' आले आहेत. 

इंडियन रोड कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन, डॉक्‍टरांची क्‍युटीकॉन परिषद आणि ऍग्रोव्हिजन असे तीन बिग बजेट कार्यक्रम नोव्हेंबर महिन्यात झाले होते. त्यावेळी हॉटेल्स फुल्ल झाले होते. आता भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामुळे हॉटेल्स हाउसफुल्ल झाल्याने हॉटेलला चांगले दिवस आले आहेत. देशभरातून येणारे पाहुणे आणि शहरातील हॉटेल्सच्या खोल्याचे ताळमेळ जुळत नसल्याने आयोजन समितीच्या सदस्यांसमोर त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी चांगलीच धावपळ उडत आहे. शहरात अजून तीन हजार खोल्यांची गरज आहे. ती पूर्ण करण्यासाठी शहरातील सर्व्हिस अपार्टमेंटचा शोध घेतला जात आहे. 

अधिवेशनासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा शहरात येत आहेत. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतरही राज्याचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राज्याचे मंत्रीही येणार आहेत. त्यामुळे शहरात पाहुण्यांचे मांदियाळी राहणार आहे. शहरातील सर्वच प्रीमियम आणि उच्चस्तरीय हॉटेलमध्ये केवळ एक हजार खोल्या आहेत. शहरात येणाऱ्या पाहुण्यांची संख्या दहा हजारांच्या जवळपास आहे. आमदार आणि रविभवनही 15 जानेवारीपासून या कार्यक्रमांसाठी बुक करण्यात आलेले आहे. त्यामुळे ऐनवेळी येणाऱ्या पाहुण्यांना नागपुरात राहण्यासाठी खोल्याच आता शिल्लक नसल्याचे बोलले जात आहे. 

हॉटेलनी दरवाढ केलेली असली तरी सर्व्हिस अपार्टमेंटच्या दरात वाढ केलेली नाही. अधिवेशनामुळे सर्वच अपार्टमेंट हाउसफुल्ल आहेत. 
-सुरेंद्र पांडे, संचालक सुकून सर्व्हिस अपार्टमेंट 

भाजपच्या अधिवेशनामुळे हॉटेल्स बुक झालेले आहे. त्यामुळे ग्राहकांची अडचण होणार असली तरी ऍडव्हान्स बुकिंग केलेल्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. हॉटेल्सच्या रूमच्या दरात वाढ केलेली नाही. 
-प्रकाश त्रिवेदी, चेअरमन, नागपूर रेसिडेन्स हॉटेल असोसिएशन. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com