जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महाअधिवेशन आजपासून अमरावतीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

चंद्रपूर : मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेडचे राष्ट्रीय महाअधिवेशन 10, 11 व 12 ऑगस्टला अमरावती येथील संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवन येथे आयोजित केले आहे. या राष्ट्रीय अधिवेशनाचा लाभ घेण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रजनी जेऊरकर व पदाधिकाऱ्यांनी केले.

अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सायंकाळी चारला गाडगेबाबा मंदिर ते संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनापर्यंत भव्य जिजाऊ पालखी सोहळा होणार आहे. या पालखी सोहळ्यात वारकरी दिंड्या, लोकनाट्य तसेच मार्गावरील चार चौकांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनावर पथनाट्य लक्षवेधी ठरणार आहे. त्याबरोबर संपूर्ण जिल्ह्यातून अनेक महिला भजन मंडळे राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सातला विविध लोककलांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम संपूर्ण जिल्ह्यातील जिजाऊ ब्रिगेडच्या प्रत्येक शाखांतर्फे आयोजित करण्यात येणार आहे.
11 ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊला विद्रोही संत तुकाराम महाराज यांच्यावरील निवडक अभंगाचे एकूण 100 कलावंत एक तास साभिनय सादरीकरण करणार आहेत. लावणीचा कार्यक्रमसुद्धा 11 ऑगस्ट रोजी सायंकाळी होणार आहे. 12 ऑगस्टला महत्त्वपूर्ण विषयांवर परिसंवाद असून, दुपारी एकला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍड. पुरुषोत्तम खेडेकर, राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष ऍड. मनोज आखरे व जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष डॉ. रेखा पाटील यांच्या उपस्थितीत या अधिवेशनाचा समारोप होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: National convention of Jijau Brigade from Amravati to today