राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता बॉक्सरची आत्महत्या !

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

क्रीडा प्रबोधिनीच्या वसतीगृहात घेतला गळफास ः सुसाईड नोटवरून दबावाखाली असल्याचा संशय

अकोला ः राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक विजेता असलेल्या क्रीडा प्रबोधनीचा बॉक्सर प्रणव राऊत (वय 22) याने क्रीडा प्रबोधिनीच्या वसतीगृहातील खोली क्रमांक चारमध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी (ता.21) सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास घडली. त्याच्या आत्महत्येमुळे क्रीडा विभागात एकच खळबळ उडाली असून, राऊत कुटुंबीयांवर मात्र, दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Image may contain: outdoor

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, शहरातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये मुळचा नागपूरचा रहिवासी असलेला प्रणव राऊत हा दैनंदिनीप्रमाणे सरावाकरिता गेला होता. याठिकाणी एका स्थानिक सामन्याचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सर्वांसोबत तो क्रीडा प्रबोधिनीतच्या वसतीगृहात परत आला. मात्र, प्रणवच परत न आल्याने त्याच्या मित्रांनी त्याला बोलविण्यासाठी खोलीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु दरवाजा उघडला नसल्याने मित्राने जबरदस्तीने दरवाजा उघडला. यावेळी प्रणवने गळफास घेतल्याचे दिसून आले. यासंदर्भात घटनेची माहिती प्रशिक्षक, खेळाडू, पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून परीस्थितीजन्य पुरावे गोळा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता सर्वोपचार रुग्णालयात पाठविला.

Image may contain: one or more people

पोलिसांच्या हाती लागली सुसाईड नोट
सॉरी पापा, मैं आपका सपना पुरा नही कर सका तो क्या, दादा का लडका या लडकी आपका सपना पुरा करेंगी’ असे वाक्य लिहलेली सुसाईड नोट रामदासपेठ पोलिसांच्या हाती लागली असून, प्रवण याने दोन वेळा सुसाईड नोट लिहली असून, आधी खोडतोड केलेली असून, दुसऱ्यावेळी पूर्ण लिहून रुममधील पंख्याला रुमाल बांधून त्याने आत्महत्या केली. तरी बॉक्सर प्रणवने असे का लिहले असावे, तो कोणाच्या दबावाखाली होता का या प्रश्‍नांची उत्तरे पोलिस शोधणार आहेत.

प्रणवचे वडील पोलिस विभागात कार्यरत
मृतक बॉक्सर प्रणव राऊतचे वडील राष्ट्रपाल राऊत हे नागपूर शहर पोलिस विभागात कार्यरत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ते कर्तव्यावर असतांनाच त्यांना मृत्यूचे वृत्त मिळाल्याने जबर धक्का बसला आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईंकाच्या ताब्यात देण्यात आला.

शवविच्छेदन गृहाजवळ नातेवाईकांची गर्दी
उत्तरीय तपासणीसाठी बॉक्सर प्रणव राऊत याचा मृतदेह शवविच्छेदन गृहाजवळ आणला होता. यावेळी प्रणवचे आई-वडील आणि नातेवाईंकांसह त्याच्या मित्रांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अमरावती विभाग क्रीडा उपसंचालक प्रतिभा देशमुख यांच्यासह अकोल्यातील विविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Image may contain: 1 person

प्रणवची आतापर्यंतची कामगिरी
जानेवारीमध्ये झालेल्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत प्रणव राऊतने महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करत सुवर्ण पदक पटकाविले होते. याचबरोबर 2016 मध्ये 14 वर्षाखालील भंडारा येथील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण, 2017 मध्ये चंद्रपूर येथील 17 वर्षाखालील राज्यस्तरीय स्पर्धेत रजत, 2018 19 ला मंबई व औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णासह राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड, तसेच संघटनांतर्गंत 2019 मध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा, 2018 मध्ये आसाम गुवाहाटी येथे 17 वर्षाखाली शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सहभा घेवून उत्कृष्ट कामगिरी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: national gold medalist Boxer suicide