Vidhan Sabha 2019 यवतमाळात धडाडणार राष्ट्रीय नेत्यांच्या तोफा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

यवतमाळ : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराने जोर धरला आहे. प्रचारासाठी आता विविध पक्षांचे राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेते मैदानात उतरले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर आता भाजप, शिवसेना व कॉंग्रेसचे नेते रणसंग्रामात उतरणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे अध्यक्ष अमित शहा, कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, राज ठाकरे यांच्या सभा जिल्ह्यात होण्याची शक्‍यता आहे.

विधानसभेसाठी भाजप-शिवसेना यांची युती, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी व मित्र पक्षाची आघाडी आहे. जिल्ह्यात युती विरुद्ध आघाडी असा सामना रंगणार आहे. नवरात्रीनंतर आता प्रचाराने वेग धरला आहे. नेत्यांच्या गावभेटी, कॉर्नर सभा सुरू झालेल्या आहेत. प्रचारासाठी मोजकेच दिवस हाती असल्याने आता पक्षांच्या नेत्यांना मैदानात उतरविले जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जिल्ह्यात सभा झाली नसली तरी त्यांच्या मुक्कामाने जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यानंतर आता भाजप, शिवसेना व कॉंग्रेसकडून नेत्यांना प्रचाराच्या जिल्हाभेटीची तयारी केली जात आहे. शुक्रवारी (ता.11) वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍड. प्रकाश आंबेडकर, कॉंग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या प्रचार सभा झाल्यात.
विरोधकांची धार आणखीन "बोथट' करण्यासाठी भाजपने प्रचाराची धुरा राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांकडे दिली आहे. जिल्ह्यात या नेत्यांना सध्या चांगलीच मागणी आहे. प्रत्येक मतदारसंघात केंद्रीय व राज्य नेतृत्वाने यावे, अशी उमेदवारांची इच्छा आहे. त्यांच्या मागणीनुसार जिल्हा भाजपने स्टार प्रचारकांची मागणी प्रदेश कार्यालयाकडे केली आहे. कॉंग्रेसनेही भाजपच्या प्रचार उत्तर देण्यासाठी राष्ट्रीय नेत्यांच्या प्रचारसभांचे नियोजन केले आहे. शिवसेनेच्या स्टार प्रचारकांच्या तोफा जिल्ह्यात धडाडणार आहेत. याशिवाय मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वणी येथे सभा होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, मनसे व राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडीची तगडी फौज मैदान गाजविण्याची शक्‍यता आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: national leaders to address prachar sabha in yavatmal