MLA Conference : देशभरातील आमदारांचे 'राष्ट्रीय विधायक संमेलन'; मुंबईत आयोजन| | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Vidhansabha

MLA Conference : देशभरातील आमदारांचे 'राष्ट्रीय विधायक संमेलन'; मुंबईत आयोजन

अमरावती : देशातील सर्व राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमधील आमदारांचे राष्ट्रीय विधायक संमेलन १५ ते १६ जून यादरम्यान आयोजित करण्यात आले आहे. पुणे येथील एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटतर्फे या संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ते मुंबईतील बीकेसी जीओ सेंटर येथे होत आहे.

नेतृत्व, लोकशाही, प्रशासन आणि शांतताप्रिय समाज निर्माण करण्याचा उद्देश, या संमेलनामागे असल्याची माहिती एमआयटी सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

राष्ट्रनिर्माण, राष्ट्रीय एकात्मिकता व राष्ट्रीय सर्वांगीण शाश्वत विकास, या त्रिसूत्रीचा प्रमुख उद्देश ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाचे उद्घाटन १६ जूनला होणार असून १७ जूनला समारोप होणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. माजी लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, डॉ. मीरा कुमार, शिवराज पाटील चाकूरकर, मनोहर जोशी व विद्यमान सभापती ओम बिर्ला या संमेलनाचे मार्गदर्शक व संयोजक आहेत. एमआयटी स्कूल ऑफ गर्व्हमेंटचे संस्थापक अध्यक्ष राहुल कराड हे या संमेलनाचे प्रमुख संयोजक आहेत.

देशभरातील सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशातील आमदारांना या संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले असून २०८८ आमदारांना नोंदणी केली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. महाराष्ट्रातील विधानसभा व विधान परिषदेतील १९७ सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक सत्रामध्ये ५० आमदार चर्चा करणार असून विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती संसदीय कमकाज मंत्री आणि विरोधी पक्षनेता प्रत्येक सत्राचे अध्यक्षपद भूषविणार आहेत.

पत्रकार परिषदेस माजी महापौर चेतन गावंडे, अमरावती विभागाचे समन्वयक अभय खेडकर, सहसमन्वयक प्रकाश महाले, बुलडाणाचे गजानन मिरगे, वाशीमचे प्रफुल्ल बानगावकर, कपिल देवके व नितीन राजवैद्य उपस्थित होते.

टॅग्स :Mumbai News