esakal | शेगावात राष्ट्रीयस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

aatyapaatya competition

आट्यापाट्या स्पर्धेत २० राज्यातून सिनीअर महिला-पुरुष संघ दाखल झाले असून, ४० संघाचा सहभाग यात आहे.

शेगावात राष्ट्रीयस्तरीय आट्यापाट्या स्पर्धेला सुरुवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शेगाव : राष्ट्रीय आट्यापाट्या फेडरेशनच्या वतीने संत नगरी शेगावमध्ये 13 डिसेंबर रोजी राष्ट्रीय आट्यापाट्या स्पर्धचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले.

राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. डी. व्ही. पाटील महाराष्ट्र महासचिव डॉ.दिपक कविश्वर, डॉ. अमरकांत चकोले पुनम कुमार वसिमराजा जय कविश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. उद्घाटन सामना बिहार आणि छत्तीसगड पुरुष मध्ये रंगला एकूण 20 राज्याच्या महिला पुरुषांच्या 40 संघांचा सहभाग या स्पर्धेत आहे. चार विभागात संघ विभागले असून, एका विभागात सहा संघ आहेत. त्यांच्या लिगनाँक आउट मॅचेस होणार आहे. एकूण 60 मॅचेस होणार आहेत. या मॅचेस अत्यंत चुरशीच्या होणार आहेत. 

बुलडाणा जिल्ह्याचे दोन खेळाडू सहभागी
प्रत्येक राज्यात राज्यस्तरीय टिम निवडण्यात आली व ती टिम राष्ट्रीय पातळीवरील शेगाव येथे आयोजित मॅचेसमध्ये खेळणार आहे. 13 ते 15 डिसेंबर पर्यंत या मॅचेस स्व.गजाननदादा पाटील मार्केट यार्डवर होत आहेत. या राष्ट्रीय स्तरावरील मॅचेसमध्ये बुलडाणा जिल्ह्याचे जगदिप बनकर आणि श्वेता देशमुख अशा दोन खेळाडूंची महाराष्ट्राच्या टिममध्ये निवड झाली आहे. राज्यस्तरीय मॅचेस व निवड चाचणी उस्मानाबाद येथे झाली होती.

हेही वाचा - गुंगीच्या औषधीचा वापर नशेसाठी

या राज्यातील टीम सहभागी
या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगढ, झारखंड, मनिपुर, बिहार, तेलंगाना, पश्चिम बंगाल, आंन्ध्रप्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पाँन्डेचरी,चंदिगड, मध्यप्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मिर, गोवा केरळ, उत्तप्रदेश, हरीयाणा, ओरीसा, गुजरात, तामिळनाडु, दादरा एनएच इत्यादी टिम सहभागी झाल्या आहेत. शेगावमध्ये याआधी राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या होत्या. त्याचे उत्कृष्ट आयोजन पाहून फेडरेशनने राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्याचा मान शेगाव शाखेला दिला आहे. 

क्लिक करा - भाजपचे आमदार भारसाकळे यांच्या निवडीला न्यायालयात आव्हान

मान्यवरांची उपस्थिती
शेगावचे पंकज देशपांडे, गजानन पैकट, योगेश जोगळेकर, अमर खराटे, भुषण दाभाडे, वैभव राऊत, ज्ञानेश्वर ताकोते, विजय पळसकर, जय कविश्वर यांनी स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यावेळी कृउबास सभापती गोविंदराव मिरगे, भाजप जिल्हा सरचिटणीस संतोषबाप्पू देशमुख, विजयबापू देशमुख, गजाननराव जवंजाळ, पवन महाराज शर्मा, राजेश अग्रवाल, पांडुरंग शेजोळे, नितीन शेगोकार, गणेश शेळके, रामा ससे, श्रीकृष्ण राहणे, वासुदेव राठोड, अरुण धनोकार, अनिल उंबरकर, दिनेश महाजन, अमर बोरसे उपस्थित होतेे.

देशाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्पर्धा आवश्यक ः आ.डॉ.संजय कुटे
आट्यापाट्या हा सर्वच ठिकाणी लोकप्रिय खेळ आहे. तर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमुळे खेळाडूंना विविध राज्यात खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे विचार, संस्कृतीची आदान प्रदान होऊन विविध राज्यातील माहिती होते. त्यामुळे देशाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्पर्धा आवश्यक असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.संजय कुटे यांनी केले आहे.

सरकारी नोकरीत आरक्षण मिळावे ः कविश्वर
महाराष्ट्र राज्य शासनाच्या नोकरीमध्ये 2016 पर्यंत आट्यापाट्याच्या राष्ट्रीय खेळाडूला 5 टक्के आरक्षण होते. परंतु पुढे हे आरक्षण काढून टाकण्यात आले. जर कब्बडी बुद्धीबळ खो-खो इत्यादी खेळांना हे आरक्षण मिळते तर मैदानी पुरातन आट्यापाट्या या खेळाला सरकारी नोकरीत आरक्षण का नाही ते मिळावे यासाठी फेडरेशन सतत प्रयत्न करत असल्याचे फेडरेशनचे राज्यस्थरीय महासचिव डॉ. दिपक कविश्वर यांनी मागणी केली आहे.