ईडीच्या विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नागपूर :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने खोटा गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच युवक कॉंग्रेसच्यावतीने संविधान चौकात अर्धनग्न आंदोलन करून निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निवडणुकीसाठी षड्‌यंत्र रचल्याचा आरोप करून सरकारवर टीका केली.

नागपूर :  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने खोटा गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच युवक कॉंग्रेसच्यावतीने संविधान चौकात अर्धनग्न आंदोलन करून निषेध नोंदवला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही निवडणुकीसाठी षड्‌यंत्र रचल्याचा आरोप करून सरकारवर टीका केली.
पवार यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच खवळले आहेत. सत्तेवर आल्यापासून भाजप ईडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या नेत्यांना धमकावत आहे. काही नेत्यांना पक्ष सोडण्यास भाग पाडले. अनेक नेत्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. धाकात ठेवण्यासाठी चौकशा लावल्या. यानंतरही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार संपूर्ण ताकदीने निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे आता त्यांना गोवल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
आंदोलन शहराध्यक्ष अनिल अहीरकर, कार्यकारी अध्यक्ष जावेद हबीब, महिला अध्यक्ष अलका कांबळे, युराकॉंचे अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, नूतन रेवतकर, वेदप्रकाश आर्य, बजरंग परिहार, बाबा गुजर, वर्षा श्‍यामकुळे, अविनाश गोतमारे, दीनानाथ पडोळे, दिनकर वानखडे, धनराज फुसे, श्रीकांत शिवनकर, अशोक काटले, देवीदास घोडे, विशाल खांडेकर, रुद्र धाकडे, रोशन भिमटे, नरेंद्र पुरी, वाजिद शेख, महेंद्र भांगे, फैजान मिर्जा, शेखर पाटील, वीरेंद्र निखार, मेहबूब खान, राकेश तिवारी, रिजवान अन्सारी, शोभा भगत, राणी डोंगरे, पुष्प डोंगरे यांच्यासह युराकॉंचे तौसिफ शेख, अमोल पालपल्लीवार, सौरभ मिश्रा, अमित पिछकाते, अजहर पटेल, सरवर अन्सारी, अनिल बोकडे, प्रणय जांबुलकर, कमलेश बांगडे, तनवीर खान, नफिल अन्सारी, अश्विन पखिडे, विश्वास पखिडे, मनीषा साहू, रवी पराते आदी सहभागी झाले होते.
पवारांना सरकार घाबरले
शरद पवार यांच्या प्रचार आणि संघटन कौशल्याला घाबरल्याने राज्य सरकारने ईडीचा वापर करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखले केले आहे. सुमारे पन्नास वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या पवारांच्या विरोधात एकही तक्रार नाही, भ्रष्टाचाराचा आरोप. आता निवडणुकीत त्यांची प्रतिमा मलिन करण्यासाठी भाजपनेच षड्‌यंत्र रचले आहे. मात्र, यामुळे भाजपच अडचणीत येणार असून राष्ट्रवादीचा कार्यकर्ता पेटून उठेल.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nationalist agitation against ED