देशीचा बोलबाला

file photo
file photo

अमरावतीः विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला नुकताच जोर चढला. अशा काळात शहरात मोठ्या प्रमाणात देशी दारूचा बोलबाला असून, विदेशीही जोरावर सुरू असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिसून येते.
गुरुवारी (ता. दहा) गुन्हेशाखेच्या पोलिसांनी दोघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दहा हजार रुपयांची देशी दारू व एक दुचाकी असा 35 हजारांचा ऐवज जप्त केला. रुपेश शेषराव थोरात (वय 34 रा. लोणटेक) व रवी शिवदास ढोके (वय 34 रा. खरकाडीपुरा) अशी अटकेतील दोघांची नावे आहेत. दोघांविरुद्ध खोलापुरीगेट ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अमरावती तहसील कार्यालय ते साबनपुरा मार्गावर रंगारी गल्लीमध्ये ही कारवाई झाली. आचारसंहिता सुरू असताना अवैध मद्यविक्रीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिस आयुक्त संजय बाविस्कर, उपायुक्त यशवंत सोळंके, शशिकांत सातव, गुन्हेशाखेचे सहायक आयुक्त बी. डी. डाखोरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक कैलास पुंडकर, हेडकॉन्स्टेबल प्रकाश जगताप, देवेंद्र कोठेकर, नीलेश पाटील, निशांत पंधरे, महादेव कास्देकर यांचे पथक या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. शहर पोलिसांनी अवैध दारूविक्री रोखण्यासाठी पोलिस ठाण्यासह अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात अनेक पथके गठित केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com