सफर विदर्भाची : पर्यटकांना खुणावतोय सातपुड्यातील निसर्गरम्य व्याघ्रप्रकल्प 

श्रीधर ढगे
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

> डोंगर, जंगल, प्राणी, पक्षी आणि वृक्षवल्लीने नटलेला 
> वन भ्रमंती, व्याघ्र प्रकल्प, तीर्थाटन असा तिहेरी आनंद 
> संग्रामपूर तालुक्‍याला लागूनच सातपुडा पर्वत रांगा 
> अंबाबरवा वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा 

खामगाव : डोंगर, जंगल, प्राणी, पक्षी आणि वृक्षवल्लीने नटलेल्या सातपुडा पर्वत रांगात सध्या गुलाबी थंडीच्या मौसमात निसग सौंदर्याची मुक्त उधळण पहायला मिळत आहे. वन भ्रमंती, व्याघ्र प्रकल्प, तीर्थाटन असा तिहेरी आनंद पर्यटक आणि भाविकांना इथे घेता येतो. बुलडाणा जिल्ह्यातील अप्रतिम असे पर्यटन स्थळ म्हणून सातपुडा पर्वत रांगा व अंबाबरवा अभयारण्य आता राज्यभर ओळखल्या जाऊ लागले आहे. 

Image may contain: outdoor, nature and water

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्‍याला लागूनच सातपुडा पर्वत रांगा आहेत. मनमोहक हिरवाईने हा परिसर सध्या नटलेला असून डोंगराने जणू हिरवा शालू नेसला आहे. झरने, तलाव, तुडुंब भरलेलं वान धरण, खळखळ वाहत असलेले धबधबे मन मोहून टाकत आहेत.

Image may contain: plant, tree, bridge, outdoor and nature

सुटीचा आनंद घेण्यासाठी लोक कुटूंबासह सातपुडा व अंबाबरवा फिरण्यासाठी येत असून वन्यजीव विभाग व प्रशासनाच्या वतीने त्यांच्यासाठी पर्यटन व राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

Image may contain: water, outdoor and nature

सरकारने 1997 मध्ये सातपुडा पर्वत रांगेत विस्तार असलेल्या अंबाबरवा वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. या भागातील पर्यटन संधी ओळखून त्याला चालना देण्यासाठी आमदार आणि माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी इको सायन्स प्रकल्प आणि इतर पर्यटन विकासाची महत्वाकांक्षी कामे हाती घेतली आहेत.

Image may contain: outdoor, nature and water

अंबाबरवा अभयारण्य परिसरात 127.110 चौरस किलोमीटरचे डोंगरदऱ्यांनी व्यापलेला असून इथली समृद्ध जैवविविधता जपली गेली आहे. सातपुड्याच्या कुशीत विसावलेले अंबाबरवा अभयारण्य निसर्ग पर्यटनासाठी उत्तम आहे. येथील नयनरम्य वनराई आणि शांत, आल्हाददायक परिसर मन प्रसन्न करून जातो. 

बुलडाणा जिल्ह्यातील श्री गजानन महाराजांचे समाधी स्थळ शेगाव, जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर, जिजाऊचे माहेरघर सिंदखेडराजा ही तीर्थाटन व पर्यटन स्थळ आहेत. तर वर्षा पर्यटन आणि जंगल भ्रमंतीचा छंद असणाऱ्या हौशी लोकांना सातपुड्याच्या पर्वत रांगा सुद्धा खुणावत आहेत. अभयारण्य फिरायचे असल्यास वन्य जीव विभागासोबत ग्रुप व कोटूंबिक सहलीची सुविधा सुध्दा आहे. तसेच निसर्गाच्या सानिध्यात राहायची उत्तम दर्जाची व्यवस्था इको सायन्स पार्क मध्ये आहे. 

Image may contain: grass, nature and outdoor

अभयारण्यात वाघोबासह शेकडो प्राणी 
व्याघ्र प्रकल्प म्हटले म्हणजे विदर्भातील ताडोबाचे जंगल डोळ्यासमोर येते. मात्र अंबाबरवा अभयारण्यात सुध्दा वाघोबाचे दर्शन घडू शकते. यावर्षी बुध्द पोर्णिमेला अभयारण्यात प्राणी गणणा करण्यात आली. तेव्हा वाघोबासह 540 निरनिराळे वन्यप्राणी वास्तव्यास असल्याचे आढळुन आले. यात चार वाघ, बिबटे सहा, अस्वल 19, लक्‍कडबघा 1, सांबर 14, निलगाय 47 यासह विविध वन्यप्राण्यांचा समावेश आहे. त्यामुळे वन्यप्राणी अभ्यासकांना सुध्दा अंबाबरवा अभयारण्य खुणावत आहे. 

Image may contain: outdoor and nature

ट्रेकर्स व पर्यटकांना आकर्षक 
जटा शंकर धबधबा, डोंगरदऱ्या पार करत गाठावे लागणारे मांगेरी महादेव मंदिर भाविकांसाठी आकर्षक ठरेल असेच आहे. हिरव्यागार पर्वतरांगेमध्ये मांगेरी महादेवाचे मंदिर आहे. शिखरावरील दगडी मोठी कडा कोरून मंदिराची निर्मिती केली आहे. याभागत जळकाकुंड, पिंपलडोह खोरा, चिमानखोरा, धबधबे, नदी, तलाव ही ठिकाणं ट्रेकर्स व पर्यटकांना आकर्षित करतात. सोबतच पूरातन गुफा, वारी हनुमान धरण, इको सायन्स पार्क आणि जंगल भ्रमंतीसाठी अंबाबरवा अभयारण्य सफारी सुद्धा आहे. यावर्षी परतीचा पाऊस जोरदार बरसल्याने पर्वत रांगेतील दगडांना पाझर फुटले असून नदी, तलाव तुडुंब भरलेले आहेत. 
- विजय हागे, निसर्गप्रेमी टुनकी 

सहलीची सुविधा 
वनजीव विभागाच्या मदतीने शाळा व महाविद्यालयीन आठवी वी ते दहावीच्या विद्यार्थ्याकरीता नाममात्र शुल्क आकारुन शैक्षणिक सहल आयोजित करण्यात येते. त्यासाठी गाईड व 30 सिटर बस उपलब्ध आहे. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना निसर्गातील वेगवेगळ्या घटकांचा आनंद लुटता येतो. तसेच अंबाबरवा अभयारण्याच्या निसर्गरम्य वातावरणात नवनवीन गोष्टी पाहायला व शिकायला मिळतात. पर्यटकांना सुध्दा वन्यजीव विभागाच्या परवानगीने अंबाबरवा अभयारण्याची सफर करता येते. त्यासाठी गाईड व अन्य सुविधा उपलब्ध आहेत. 
- सुहास कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सोनाळा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Natural tiger project in Satpura