नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी सलोख्याची भूमिका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नागपूर : नागपुरात होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी नाट्य परिषदेच्या दोन्ही शाखांनी सलोख्याच्या भूमिकेतून पहिले पाऊल टाकले आहे. रविवारी (ता. 30) कार्यकारिणीची बैठक झाल्यानंतर नागपुरातील रंगकर्मींची सर्वसमावेशक बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे, असे नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन 22 ते 25 फेब्रुवारीपर्यंत नागपुरात होणार आहे. रेशीमबाग मैदान आणि कविवर्य सुरेश भट सभागृह ही दोन ठिकाणे संमेलनस्थळ म्हणून जवळपास निश्‍चित केली आहेत. संमेलनाच्या आयोजनाचा अवाका आणि 33 वर्षांनंतर संमेलन होणार असल्याने यजमानांकडून असलेली अपेक्षा या दोन्हींचा विचार करीत नागपुरातील रंगकर्मींचा सकारात्मक सहभाग अत्यंत महत्त्वाची बाब ठरणार आहे.
संमेलनस्थळ म्हणून नागपूरची घोषणा झाल्यावर नाट्य परिषदेच्या दोन्ही शाखांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी याबाबत प्राथमिक चर्चा केली. विविध समित्या, त्यांचे नियोजन, जबाबदाऱ्या आदींबाबत निर्णय घेण्यासाठी कार्यकारिणीची बैठक झाल्यावर नागपुरातील रंगकर्मींशी चर्चा करणे आवश्‍यक असल्याचे मत झाले. यातून सूचना, अपेक्षा तसेच नवीन कल्पना मागविण्यात येतील. त्यानंतर संमेलन अधिक नीटनेटके व नियोजनबद्ध कसे करता येईल, यादृष्टीने योग्य पाऊल टाकता येईल, असे नाट्य परिषदेच्या नागपूर शाखेचे अध्यक्ष प्रफुल्ल फरकसे यांनी सांगितले.
आर्थिक आव्हान
नाट्य संमेलनाच्या आयोजनासाठी मोठा खर्च उभा करण्याचे आवाहन यजमानांपुढे आहे. राजकीय पुढाऱ्यांसह नाटकांवर प्रेम करणाऱ्या इतर क्षेत्रातील मंडळींना संमेलनासाठी आर्थिक पाठबळ देण्याचे आवाहन नाट्य परिषद करीत आहे. याशिवाय निवासाची व्यवस्था, पाहुण्यांसाठी वाहनांची व्यवस्था, व्यवस्थापनाठी लागणारे व्हॉलिंटियर्स आदींचे काटेकोर नियोजन करण्याचे आवाहनही आयोजकांपुढे आहे.

Web Title: natya sammelan news