नवप्रकाश योजनेला मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मार्च 2017

नागपूर - थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना वगळून अन्य सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. योजनेअंतर्गत थकबाकीचा भरणा करताचा वीजजोडणीही मिळविता येईल.

नागपूर - थकीत वीजदेयकांमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या सार्वजनिक नळयोजना वगळून अन्य सर्व उच्च व लघुदाब वीजग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नवप्रकाश’ योजनेला ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. योजनेअंतर्गत थकबाकीचा भरणा करताचा वीजजोडणीही मिळविता येईल.

नवप्रकाश योजनेअंतर्गत ३० एप्रिलपर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास १०० टक्के व्याज व विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे. यापूर्वी ही मुदत ३१ जानेवारीपर्यंत होती. १ मे ते ३१ जुलैदरम्यान मूळ थकबाकीसह व्याजाची २५ टक्के रक्कम भरल्यास उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकार शुल्क माफ होईल. योजनेत ३१ मार्चपर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेले कृषिपंपधारक, घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक तसेच इतर वर्गवारीतील वीजग्राहक थकबाकीमुक्तीसाठी पात्र ठरेल. लोकअदालत किंवा न्यायप्रविष्ट असलेल्या थकबाकीच्या प्रकरणातील थकबाकीदारांनासुद्धा योजनेचा लाभ घेता येईल. मूळ थकबाकीच्या रक्कमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सोय असून संबंधित ग्राहकांच्या थकित देयकांची व किती रक्कम भरायची याबाबत माहिती उपलब्ध केली आहे. थकबाकीमुक्त झालेल्या वीजग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीजजोडणी देण्यात येत आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार वीजग्राहकांनी नवप्रकाश  योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. 

विदर्भातील परिमंडळनिहाय तपशील
परिमंडल     लाभार्थी ग्राहक     रक्कम भरणा (कोटी)
नागपूर    ६०५७    २.२९५३
चंद्रपूर    ३९९०    १.०७२१
अकोला    ५६३३    १.४४०२
अमरावती    ४३९५    १.१८४८
गोंदिया    ४९७९    १.५३६७
एकूण    २५०५४     ७.५२९१

Web Title: Nav prakash scheme extended

टॅग्स