नवनीत राणांच्या जातप्रमाणपत्र खटल्यात रामदेवबाबा साक्षीदार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 मार्च 2019

अमरावती - नवनीत कौर-राणा यांच्या जातप्रमाणपत्राबाबत उच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची ६ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यातच त्यांच्या वडिलांच्या जातसंदर्भात अमरावती येथील न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची सुनावणी आठ मार्च रोजी होणार आहे. या प्रकरणात योगगुरू रामदेवबाबा यांच्यासह एकूण १७ साक्षीदार करण्यात आले आहे. 

अमरावती येथील दिवाणी न्यायालयात खासदार आनंदराव अडसूळ यांनी दाखल केलेल्या रिप्रेझेंटेटिव्ह सूटची सुनावणी आठ मार्च रोजी ठेवण्यात आली आहे. खासदार अडसूळ यांच्या वतीने देण्यात आलेल्या साक्षी पुराव्यांमध्ये नवनीत राणा यांच्या वडिलांचे मूळ निवास असलेल्या पंजाब येथील चमको साहेब खालसा सिनियर सेकंडरी स्कूलचे प्राचार्यालाही बोलावले आहे. 

आणि आमदार राणा दाम्पत्याचे लग्न लावणारे पतंजली ग्रुपचे सर्वेसर्वा स्वामी रामदेवबाबा यांनाही साक्षी पुराव्यासाठी बोलावण्यात येणार आहे. वरिष्ठ श्रेणी फौजदारी न्यायालयात खासदार अडसूळ यांनी आमदार रवी राणा यांच्या अटकेसाठी दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी सात मार्च रोजी होणार आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navneet Rana Caste Certificate Case Ramdevbaba Witness