नवनीत राणांची लोकसभेत मेळघाटसाठी गर्जना

navneet rana.
navneet rana.

अमरावती : सुदूर प्रांताच्या विकासामध्ये रेल्वेची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आदिवासी आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी रेल्वेचे जाळे गावखेड्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. अशा वेळी मेळघाटातून जाणारा रेल्वेमार्ग वळविण्याच्या मुद्यावर सध्या चांगलाच खल सुरू आहे. जिथे रेल्वेचे जाळे विस्तारण्याची आवश्यकता आहे, तिथे मेळघाटातील रेल्वेमार्ग बमद करण्यात येऊ नये यासाठी बुधवारी (ता. २३) खासदार नवनीत राणा यांनी हा मुद्दा लोकसभेत उचलला. मेळघाटला रेल्वेच्या नकाशातून गायब होऊ देणार नाही, असे त्यांनी सांगितले.

ब्रिटीशकालीन अकोला- अकोट- धूळघाटरेल्वे- डाबका-खंडवा मार्गावर धावणारी रेल्वे ब्रॉडगेज करण्याचे काम तात्पुरते थांबविण्यात आले आहे. परंतु आता सदर रेल्वेचा मार्ग परावर्तित करण्यासाठी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले.
ज्यामुळे आदिवासींवर अन्याय होऊन ते मुख्य प्रवाहातून बाहेर फेकल्या जाऊ शकतात व विकासापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे हा मार्ग कुठल्याच परिस्थितीत बदलू नये व तातडीने ब्रॉडगेज करून या मार्गावरून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी खासदार नवनीत रवी राणा यांनी आज सभागृहात केली.

पश्‍चिम विदर्भाची आण- बाण- शान असणारी ब्रिटीशकालीन नॅरोगेज रेल्वे ही कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी यांची जीवनवाहिनी आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे अनेकांना त्रास भोगावा लागत आहे. यासोबतच मूर्तिजापूर- अचलपूर या मार्गावरील अनेक गावांतील लोकांना आता दळणवळण करताना त्रास होत आहे. त्यामुळे या भागातील व्यापार-उद्योग मंदावला आहे. त्यासाठी ही रेल्वे तत्काळ सुरू करावी, अशी मागणी नवनीत राणा यांनी लोकसभेत केली.

सविस्तर वाचा -  मानसिक शांतीसाठी खुणावतेय कामठीचे विश्वविख्यात ‘ड्रॅगन पॅलेस’

या रेल्वेमुळे दर्यापूर-अंजनगाव तालुक्‍यातील अनेक गावांना लाभ होणार आहे, म्हणून शकुंतला रेल्वे सुरू करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले.
 
संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com