१३ हजारांवर ग्राहकांना ‘नवप्रकाश’

१३ हजारांवर ग्राहकांना ‘नवप्रकाश’

शुल्‍क न भरताही वीजजोडणी थकबाकीदारांकडून ४ कोटींचा भरणा
नागपूर - थकबाकीमुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना नव्याने वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने ‘नवप्रकाश’ योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत विदर्भातील १३ हजार ६९० थकबाकीदारांनी ४ कोटी १६ हजार ६१६ रुपयांचा भरणा करून सहभाग नोंदविला आहे. योजनेत थकबाकीमुक्त वीजग्राहकांना नवीन वीजजोडणी शुल्क न भरताच देण्यात येत आहे.

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या लघू व उच्चदाब थकबाकीदार ग्राहकांसाठी नोव्हेंबर महिन्यापासून ‘नवप्रकाश’ योजना सुरू केली. एप्रिल २०१७ पर्यंत मुदत असलेल्या या योजनेतून थकबाकीमुक्तीची व निःशुल्क नवीन वीजजोडणीची संधी थकबाकीदारांसाठी उपलब्ध झालेली आहे. २६ डिसेंबरपर्यंत नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर व गोंदिया या जिल्ह्यांतील १६ हजार ६९० वीजग्राहकांनी योजनेत सहभाग नोंदविलेला आहे. थकबाकीदारांनी मूळ थकबाकीपोटी ४ कोटी १६ हजारांचा ६१६ रुपयांचा भरणा केला आहे. योजनेला प्रतिसाद वाढत आहे. 

‘नवप्रकाश’ योजनेअंतर्गत ३१ जानेवारी २०१७ पर्यंत मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराची १०० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. तसेच १ फेब्रुवारी ते ३० एप्रिलपर्यंत मूळ थकबाकीसोबत २५ टक्के व्याजाच्या रकमेचा भरणा करावा लागणार आहे. उर्वरित ७५ टक्के व्याज व १०० टक्के विलंब आकाराची रक्कम माफ होणार आहे.

मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in संकेतस्थळावर संबंधित थकबाकीदार ग्राहकांच्या थकीत देयकांची व किती रक्कम भरायची, याबाबत माहिती उपलब्ध करण्यात आली आहे. या संकेतस्थळावर थकबाकी भरण्याची ‘ऑनलाइन’ सोय उपलब्ध आहे. ‘नवप्रकाश’ योजनेत सहभागी होण्यासाठी मूळ थकबाकीची २ टक्के रक्कम भरण्याची अटसुद्धा रद्द करण्यात आली आहे. 

परिमंडळनिहाय नवप्रकाशित वीजग्राहक
परिमंडळ              ग्राहक संख्या    भरणा केलेली रक्कम

नागपूर               ३,५५९                 १,२९,९८,५६१ 
अमरावती            २,०२९                 ५२,९५,८८२ 
अकोला             २,२५५                 ६०,७५,७७३ 
चंद्रपूर               २,३१५                 ५९,१२,८४८ 
गोंदिया              ३,४९२                 ९७,३३,५५२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com