नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

नागपूर  : नवरात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला असून, उपराजधानीतही देवीच्या मंदिरांसह अनेकांच्या घरी विधिवत घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या मंडपात वाजतगाजत विविध रूपातील देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत आगमन झाले. भाविकांचा ओसंडून वाहणारा जल्लोष सर्वच प्रमुख रस्त्यावरून दिसून येत होता. पुढील नऊ दिवस अखंड ज्योत, दुर्गासप्तशती पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण आदी धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नागपूर  : नवरात्रोत्सवाला रविवारपासून प्रारंभ झाला असून, उपराजधानीतही देवीच्या मंदिरांसह अनेकांच्या घरी विधिवत घटस्थापना करण्यात आली. सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांच्या मंडपात वाजतगाजत विविध रूपातील देवीच्या मूर्तीचे वाजतगाजत आगमन झाले. भाविकांचा ओसंडून वाहणारा जल्लोष सर्वच प्रमुख रस्त्यावरून दिसून येत होता. पुढील नऊ दिवस अखंड ज्योत, दुर्गासप्तशती पाठ, नवचंडी, कुमारीपूजन, होमहवन, भजन, कीर्तन, गोंधळ, जागरण आदी धार्मिक कार्यक्रमांसोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सायंकाळी पावसाच्या हजेरीमुळे भाविकांची धावपळ झाली तरी अनेकांनी पावसात नाचण्याचा आनंद लुटला.
शहरातील देवीच्या मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. पारडीतील भवानी मंदिर, आग्याराम देवी, सेंट्रल एव्हेन्यूजवळील रेणुकादेवी, सुभाष मार्गावरील गीता मंदिर, प्रतापनगरातील दुर्गा मंदिर, त्रिमूर्तीनगरातील गजानन मंदिर, चिखलीमधील रेणुका देवीसह शहरातील अन्य देवी मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. घटस्थापनेसोबतच प्रसिद्ध मंदिरांमध्ये हजारोंच्या संख्येने अखंड मनोकामना ज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. रविवार असल्याने पहिल्याच दिवशी अनेक मंदिरांमध्ये रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी रांगा दिसून आल्या. अनुचित प्रकार टाळण्यासाठी मंदिर परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.
सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळांचीसुद्धा सकाळपासूनच लगबग सुरू होती. धंतोलीतील दीनानाथ विद्यालयात बंगाली बांधवांतर्फे साजरा होणारा नवरात्रोत्सव नागपूरकरांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. दुपारीच बंगाली बांधवांनी उत्साह आणि भावपूर्ण वातावरणात मूर्तीची स्थापना केली. दुपारपासून मातेच्या मूर्ती नेण्यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांचे चितारओळीसह शहराच्या वेगवेगळ्या ठिकाणी असणाऱ्या मूर्तिकारांकडे आगमन सुरू झाले. वाजतगाजत मिरवणुकीने मूर्तींचे मंडपात आगमन झाले. शहराच्या वेगवेगळ्या भागात विविध मंडळ आणि संस्थांतर्फे रास गरबाचे आयोजन केले आहे. सोमवारपासून गरबा, दांडिया खेळणाऱ्या तरुणाईचा जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळणार आहे. क्वेटा कॉलनीतील गरबा प्रसिद्ध आहे. यासोबतच संकल्प, लोटस कल्चरल, रायसोनी आदी संस्थांतर्फे गरबा महोत्सवाचे वेगवेगळ्या ठिकाणी आयोजन केले आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Navratri festival starts in earnest