esakal | गडचिरोली : नक्षलवाद्यांची वनरक्षकांना बेदम मारहाण, वनविभागाचे कार्यालयही जाळले 
sakal

बोलून बातमी शोधा

Gdc fire.

एटापल्ली तालुक्यातील भामरागड वन विभागाअंतर्गत येणाऱ्या गट्टा जांभिया येथे मंगळवारी रात्री १० ते १२ सशस्त्र नक्षलवादी आले. त्यांनी आपला मोर्चा थेट वनविभागाच्या कार्यालयाकडे वळविला. यावेळी तेथे उपस्थित दोनवनकर्मचाऱ्यांना धमकी दिली व त्यांना कार्यालयाचे कुलूप काढण्यास सांगितले.

गडचिरोली : नक्षलवाद्यांची वनरक्षकांना बेदम मारहाण, वनविभागाचे कार्यालयही जाळले 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गडचिरोली : सशस्त्र नक्षलवाद्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाची जाळपोळ करून दोन वनरक्षकांना बेदम मारहाण केल्याची घटना गट्टा येथे काल रात्री घडली. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एटापल्ली तालुक्यातील भामरागड वन विभागाअंतर्गत येणाऱ्या गट्टा जांभिया येथे मंगळवारी रात्री १० ते १२ सशस्त्र नक्षलवादी आले. त्यांनी आपला मोर्चा थेट वनविभागाच्या कार्यालयाकडे वळविला. यावेळी तेथे उपस्थित दोनवनकर्मचाऱ्यांना धमकी दिली व त्यांना कार्यालयाचे कुलूप काढण्यास सांगितले. त्यानंतर नक्षलवाद्यांनी आत प्रवेश करून कागदपत्र तसेच अन्य साहित्याला आग लावली. या आगीत इमारतीचा काही भाग जळून खाक झाला. त्यासोबतच तिथे असलेल्या दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करण्यात आली. तसेच नक्षलवादी जाताना त्यांचे मोबाईल देखील घेऊन गेले.

- नागपुरमध्ये पॉश फ्लॅटमधील सेक्‍स रॅकेटवर छापा

 
या संदर्भात गट्टा वनपरिक्षेत्रधीकारी पाटील यांना माहिती विचारली असता त्यांनी जाळपोळीच्या घटनेला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे, गट्टा येथे पोलिस मदत केंद्र असतानाही नक्षलवाद्यांनी गावात येऊन वन कार्यालयाची जाळपोळ केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

loading image
go to top