एटापल्लीत नक्षली बंद प्रभावी; वाहतूक ठप्प

मनोहर बोरकर
रविवार, 19 मे 2019

गेल्या महिन्यात जहाल महिला माओवादी रामको नरोटी व शिल्पा दूर्वा यांना भामरागड तालुक्यातील गुडूरवाही जंगलात पोलिसांनी खोट्या चकमकित ठार केल्याच्या निषेधार्थ दिनांक 19 में रविवारला जिल्हा बंद पाळून घटनेचा व शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवण्याचे आव्हान माड़िया आदिवासी भाषेतील पत्रके व बॅनरमधून करण्यात आले होते.

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यात नक्षल्यांनी पुकारलेल्या जिल्हा बंदच्या प्रभावाने गट्टा, जारावंडी, कसनसुर, अहेरी व गडचिरोली अशा चारही मार्गाची वाहतूक नक्षल्यांनी रस्त्यावर झाड़े आडवी टाकून व बॅनर बांधून अडवील्याने सकाळपासून बंद आहे. तसेच दुपारपर्यंत बाजार पेठही व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आली होती.

गेल्या महिन्यात जहाल महिला माओवादी रामको नरोटी व शिल्पा दूर्वा यांना भामरागड तालुक्यातील गुडूरवाही जंगलात पोलिसांनी खोट्या चकमकित ठार केल्याच्या निषेधार्थ दिनांक 19 में रविवारला जिल्हा बंद पाळून घटनेचा व शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवण्याचे आव्हान माड़िया आदिवासी भाषेतील पत्रके व बॅनरमधून करण्यात आले होते.

त्यामुळे आज सकाळी 6:30 वाजता एटापल्लीवरून जाणारी नागपुर आगाराची पहिली बसफेरी एटापल्ली पासून 5 किमी अंतरावर गुरूपल्ली गावाजवळ सुरजागड पहाड़ी वरील लोहखनीज वाहतूक करणारे जळीत ट्रकपर्यंत जाऊन परत आली. त्याठिकाणी झाड़े आडवी टाकून बंद पाळण्याचा मजकूर लिहिली बॅनर व शेजारीच असलेल्या वनविभागाच्या लाकड़ी बिटाना आग लाऊन जाळण्यात आले यात वनविभागाचे लाखो रुपये नुकसान झाले आहे. 

नक्षल्यांचा चौफेर धुमाकुळ दिसुन येत असल्यामुळे एटापल्लीची मुख्य बाजारपेठही दुपार पर्यंत बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे नक्षली दहशतीचा परिणाम तालुक्यात सर्वत्र दिसुन येत असून पोलिसांकडून दक्षता बाळगली जात आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naxal bandh in Etapalli Gadchiroli