नक्षल्यांनी उभारले कमांडर रामकोचे स्मारक

file photo
file photo

गडचिरोली : गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी नक्षल कमांडर रामकोचे स्मारक उभारले आहे. एटापल्ली तालुक्‍यातील कोइंदुल येथील ही घटना आहे. जहाल नक्षली रामको हिचा एप्रिल महिन्यात पोलिस चकमकीत मृत्यू झाला होता. नक्षली नेता भास्करची याची रामको ही पत्नी होती. बनावट चकमकीत रामकोला ठार मारल्याचा बदला घेण्यासाठी जांभुळखेडा स्फोट घडविल्याचा दावा नक्षल्यांनी केला. रामकोचे स्मारक हे पोलिसांसाठी आव्हान ठरले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एप्रिल महिन्यात भामरागड तालुक्‍यातील गुंडूरवाही येथे पोलिस चकमकीत ठार झालेली महिला नक्षल कमांडर रामको नरोटी हिचे स्मारक उभारून नक्षल्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. 27 एप्रिल रोजी गुंडूरवाही येथे पोलिस-नक्षल चकमकीत दोन महिला नक्षलवादी टिपण्यात पोलिसांना यश आले होते.
गडचिरोली पोलिसांची नक्षलविरोधी मोहीम नियमित स्वरूपात सुरू असताना गावालगत जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिस पथकावर हल्ला केला. पोलिस पथकाचा घातपात करण्याच्या उद्देशाने नक्षलवाद्यांनी घटनास्थळी मोठा भूसुरुंग स्फोट घडवून आणला. चकमक संपल्यावर पोलिसांनी घटनास्थळाच्या केलेल्या पाहणीत दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. गट्टा दलम कमांडर आणि कुख्यात महिला नक्षली रामको नरोटी हिचा यात मृत्यू झाला. सोबतच भामरागड दलम सदस्य शिल्पा धुर्वा ही अन्य एक महिला नक्षल चकमकीत ठार झाली. रामको नरोटी गेली पंचवीस वर्षे नक्षल चळवळीत सक्रिय होती. तिच्यावर 16 लाखांचे बक्षीस होते, तर सुमारे पन्नासहून अधिक हिंसक कारवायांत तिचा थेट सहभाग होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com