धरपकडीमुळे नक्षल समर्थक झाले भूमिगत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

गडचिरोली : राज्यभरात नक्षल समर्थकांची धरपकड सुरू असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जण कारवाईच्या धास्तीने भूमिगत झाल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी महेश राऊत यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या सहवासातील लोकांची माहिती गोळा करून पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. अनेक जण नक्षलसमर्थक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्‍यातील कसनसूर जंगलात काही दिवसांपूर्वी 40 माओवादी चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर आंध्र प्रदेशातील काही सामाजिक संस्थांच्या लोकांनी या घटनेबद्दल निषेध करून चौकशीची मागणी केली होती.

गडचिरोली : राज्यभरात नक्षल समर्थकांची धरपकड सुरू असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील अनेक जण कारवाईच्या धास्तीने भूमिगत झाल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी महेश राऊत यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या सहवासातील लोकांची माहिती गोळा करून पोलिसांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. अनेक जण नक्षलसमर्थक असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्‍यातील कसनसूर जंगलात काही दिवसांपूर्वी 40 माओवादी चकमकीत ठार झाले होते. त्यानंतर आंध्र प्रदेशातील काही सामाजिक संस्थांच्या लोकांनी या घटनेबद्दल निषेध करून चौकशीची मागणी केली होती. चकमकीत निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून पोलिसांचे हे कृत्य चुकीचे असल्याचा आरोप त्यांनी केला होता. जे कार्यकर्ते यात सहभागी झाले होते; त्या सर्वांची माहिती पोलिस विभागाने गोळा केली आहे. यातील काही जण जिल्ह्यातील असल्याने त्यांच्यावर आता अटकेचा फास आवळला जाणार आहे. गृहविभागाच्या आदेशानुसार गडचिरोली पोलिसांकडूनही नक्षल समर्थकांवर कारवाई केली जाण्याची शक्‍यता आहे.
चळवळीला धक्का
गडचिरोली जिल्हा पोलिसांनी सुरू केलेल्या नक्षल विरोधी अभियानामुळे गेल्या दोन वर्षांत दीडशेच्या वर माओवादी ठार झाले. यात काही मोठे नेते तथा दलम कमांडरचाही समावेश आहे. यामुळे नक्षल चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

Web Title: Naxal supporters became underground