पोलिसांनी उधळला नक्षल्यांचा स्फोटाचा कट

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जुलै 2019

नक्षलविरोधी मोहिमेवर असताना स्फोटकांद्वारे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट पोलिसांनी बुधवारी उधळून लावला. चामोर्शी तालुक्‍यातील माडेआमगावजवळ नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवली होती. ती निकामी करण्यात पोलिसांना यश आले. रेगडी पोलिस मदत केंद्रातील पोलिस रेगडी ते कोतेपल्ली रस्ता आज सकाळी खुला करीत असताना माडेआमगाव फाट्याजवळ असलेल्या पुलाखाली नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवल्याचे दिसून आले.

गडचिरोली - नक्षलविरोधी मोहिमेवर असताना स्फोटकांद्वारे पोलिसांचा घातपात करण्याचा नक्षल्यांचा कट पोलिसांनी बुधवारी उधळून लावला. चामोर्शी तालुक्‍यातील माडेआमगावजवळ नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवली होती. ती निकामी करण्यात पोलिसांना यश आले. रेगडी पोलिस मदत केंद्रातील पोलिस रेगडी ते कोतेपल्ली रस्ता आज सकाळी खुला करीत असताना माडेआमगाव फाट्याजवळ असलेल्या पुलाखाली नक्षल्यांनी स्फोटके पेरून ठेवल्याचे दिसून आले. त्यानंतर गडचिरोली येथील बॉंबशोधक व नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. या पथकाने दहा किलो वजनाची स्फोटके निकामी केली. नक्षलवाद्यांचा नक्षल सप्ताह रविवारपासून (ता. 28) सुरू होत असल्याने हिंसक कारवाया घडवून आणण्यासाठी नक्षलवाद्यांकडून प्रयत्न केले जात आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalite Blast Planning Flop by Police