Naxalite
Naxalite

नक्षल्यांचा खात्मा, वर्षभरात अर्धशतक

नागपूर - गडचिरोली जिल्ह्यासह चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यात पसरलेला नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठीच्या यशस्वी प्रयत्नांमुळे गेल्या वर्षभरात ५० नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. तसेच ४३ नक्षलवादी व समर्थकांना विविध ठिकाणांवरून अटक करण्यात आली आहे. तसेच १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाचा मार्ग स्वीकारल्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला.   

नक्षलग्रस्त भागासाठी प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या लोककल्याणकारी व विकासाच्या  विविध योजनांमुळे तसेच पोलिसांचा दुर्गम भागातील ग्रामस्थांशी वाढलेला जनसंपर्क व  संवादामुळे शासनाच्या विकासाला जनतेचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला आहे.

पोलिसांच्या यशस्वी विशेष रणनीतीमुळे २०१८ या वर्षात नक्षली चळवळीला मोठ्या प्रमाणावर हादरा बसून नक्षल चळवळीची प्रचंड मोठी हानी झाली आहे. नक्षल्यांबरोबरीच्या लढाईत पोलिसांची उत्तम कामगिरी राहिली.    
२०१८ या वर्षात झालेल्या विविध चकमकीत ५० नक्षली ठार झालेत; तसेच, नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक आणि नक्षल्यांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा फटका बसला. ८० गावांनी गावबंदी ठराव करून नक्षल्यांना गावाबाहेरच रोखल्यामुळे नक्षल्यांना  अटकाव केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक तालुक्‍यांमध्ये स्थानिक गावकऱ्यांनी नक्षली बॅनर, नक्षल नेत्यांचे पुतळे जाळल्याने, तसेच नक्षल स्मारक तोडल्यामुळे नक्षल्यांचा उरलेला जनाधारही कमी झालेला आहे. त्यातच पोलिसांनी चहुबाजूने केलेल्या नाकेबंदीमुळे नक्षलवादी सध्या बॅकफुटवर येऊन हतबल झालेले आहेत.

हिंसेचे समर्थन करणाऱ्या नक्षलवाद्यांना प्रतिउत्तर देऊन गडचिरोली पोलिस दलातील शूर जवानांनी सरलेल्या वर्षात अभूतपूर्व असे यश प्राप्त केले आहे. या हिंसक प्रवाहात भरकटलेल्या नक्षलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू असून नुकतेच शरण आलेले सात जहाल नक्षलवादी, ही त्याचीच परिणिती आहे.
- शरद शेलार, विशेष पोलिस महानिरीक्षक, नक्षलविरोधी अभियान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com