नक्षली धाक कायम पोष्टर बाजीतुन धमकी युद्ध!

नक्षली धाक कायम पोष्टर बाजीतुन धमकी युद्ध!

एटापल्ली (गडचिरोली)- तालुक्यात नक्षल्यांनी दिनांक 30 नोव्हेंबरला गट्टेपल्ली गांव जंगल परिसरात पंतप्रधान ग्राम सड़क निर्माण कार्यावरिल दहा जेसीबी मशीनसह सोळा वाहने पटवून दिल्या नंतर गुरिल्ला वॉर ग्रुपचा 18 वा स्थापन दिवस 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर दरम्यान साजरा करण्याचे आवाहन करणारे व आत्मसमर्पित नक्षल कमांडो पहाड़सिंग विरुद्ध मजकूर छापलेली पोष्टर व ब्यानर सर्वत्र टाकल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

त्यामुळे लोहखनीज उत्खनन करणारी कंपनी लॉयलड्स मेटल कडून वाहतूक करणारी दोनसे ट्रक, दहा पोकलैंड मशीन, चार कंटेनर, तीन क्रेन व दोन जेसीबी मशीन अशी 219 वाहने (ता. 2) शनिवारला सायंकाळी दरम्यान सुरक्षेच्या कारणाने उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय एटापल्ली समोर, तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरी, समोर व इतरत्र सुरक्षित हलविन्यात आली असून उत्खनन कार्य बंद ठेवण्यात आले आहे.

पत्रके सुरजागड लोहखनीज पहाड़ी परिसर, पोलिस स्टेशन गट्टा, पोलिस स्टेशन जारावंडी, पोलिस स्टेशन कसनसुर, पोलिस स्टेशन कोटमी, पोलिस स्टेशन हालेवार, पोलिस स्टेशन आलदंडी, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हेडरी इत्यादीच्या हद्दीत व इतर सर्वत्र पोष्टर-बॅनर आढळली आहेत, मजकुरात शासनाच्या धोरणांचा विरोध व आत्मसमर्पित नक्षलवादी पहाड़सिंग हा गद्दार असल्याने त्याला धड़ा शिकवावा, खोटे आत्मसमर्पण दाखवून जन आंदोलनास नागरिकांच्या मदतीची लाखो रुपये रक्कम तो लुटुन घेऊन गेल्याचा व अशा गद्दारांमुळे चळवळीचे कोणतेही नुकसान झाले नसल्याचा उल्लेख असून चळवळ आणखी मजबूत होत असल्याचे पत्रकातुन म्हटले आहे. पोलिस विभागाकडून नक्षल विरोधी शोध मोहीम तिव्र करण्यात येऊन हेलीकॉप्टर द्वारे टेहळनी तसेच स्थानिक पोलिसांचे सी सिक्सटी कमांडो जवान, केंद्रीय राखीव पोलिस दल अशा सक्षम यंत्रना नक्षल्यांकडून होणारा घाटपात कारवाही रोखण्याची खबरदारीसह नक्षल्यांचा शोध घेतला जात आहे.

सदर पत्रकात भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी छत्तीसगढ़, मध्यप्रदेश, महाराष्ट्र स्पेशल झोनल कमेटी असा उल्लेख आहे, नक्षली धाकामुळे तालुक्यातिल दुर्गम भागातील वाहतूक विस्कळीत झाली असून सर्वत्र दहशतीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com