नक्षलवाद भारतासाठी अभिशाप - आनंद मिश्रा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 सप्टेंबर 2018

नागपूर - नक्षलग्रस्त भागात बोलण्याची मुभा नाही. जो बोलतो त्याला जगण्याचा अधिकार नसतो. तेथे आदिवासींवर अत्याचार होतात. हाच आदिवासी नक्षल्यांच्या विरोधात उभा ठाकला असता तर छत्तीसगडमधील नक्षलवाद संपुष्टात आला असता. आता नक्षलवाद भारतासाठी अभिशाप ठरल्याचे मत अधिवक्‍ते आनंद मिश्रा यांनी व्यक्‍त केले.

भूमकाल संघटनेच्या वतीने बुधवारी आयोजित ‘शहरी नक्षलवाद...संपणार का?’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे, वक्‍ता म्हणून अधिवक्‍ते आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद मिश्रा, पत्रकार सुनील खोब्रागडे, भूमकाल संघटनेचे अध्यक्ष प्रा. अरविंद सोहनी होते. मिश्रा यांनी ‘शहरी नक्षलवादाची शिकार-बस्तर’ विषयावर भाष्य करताना बस्तरमधील नक्षल चळवळीची आणि कारवाईची माहिती दिली.

नक्षलग्रस्त भागातील ‘जल, जमीन आणि जंगल’ आमचेच असून, पोलिस आमच्यावर हिंसा करतात, असे नक्षल्यांना वाटते. म्हणून नक्षलवादी विचारांचे लोक शांतीयात्रा काढतात. मात्र, आता कम्युनिस्ट नक्षलवादाचा विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले. 

‘शहरी नक्षलवादाचे पक्षीय राजकारण’ विषयावर देवेंद्र गावंडे यांनी बाजू मांडली. तसेच सुनील खोब्रागडे यांनी ‘नक्षलवादाचे वास्तव-शहरी मुखवटा’ हा विषय मांडला.

Web Title: Naxalite India curse Anand Mishra