गडचिरोली : नक्षलवाद्यांनी जाळले टँकर, मिक्सर मशीन आणि रोड रोलर

Gadchiroli
Gadchiroli

एटापल्ली (जिल्हा गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलीस स्टेशन हद्दीतील ऐमलीवरुन मंगूठा गावाकड़े जाणाऱ्या मार्गावर पंतप्रधान ग्राम सड़क योजना निर्माण कामावरील एक टँकर, दोन सिमेंट कॉक्रेट मिक्सर मशीन, रोड रोलर व सेंट्रिंग वापराचे साहित्य रविवारी रात्री दरम्यान नक्षलवाद्यांकडून जाळून टाकण्यात आले. यात ठेकेदाराचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

सदर रस्ता निर्माण काम यवतमाळच्या शाम बाबा कंट्रक्शन कंपनीचे अनिल सेवदा नामक ठेकेदार करीत असल्याची माहिती असून जाळण्यात आलेली वाहने व साहित्य एटापल्ली नगरपंचायत उपाध्यक्ष रमेश गंपावार यांचे मालकीचे असल्याचे माहिती आहे.

माओवाद्यांनी चालू वर्षात तालुक्यात धुमाकुळ घातला असून, विकास कामांवरील वाहनांची जाळपोळ करण्यासह नागरिकांचे पोलिस खबरी असल्याच्या संशयावरून अपहरण व हत्या करण्याचे सत्रच नक्षल्यांनी अवलंबले असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे गेली काही दिवसांपासून तालुक्यात नक्षली दहशत पसरली आहे. टँकर, मिक्सर मशीन व रोड रोलर जाळल्याने पंतप्रधान ग्राम सड़क व मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेच्या रस्ते निर्माण कामाला माओवाद्यांचा तिव्र विरोध असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com