नक्षलवाद्यांची आता महिलांवर नजर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

एटापल्ली, (जि.गडचिरोली) - पोलिसांनी नक्षलविरोधी राबविलेल्या अभियानामुळे नक्षलवाद्यांच्या चळवळीला जबर हादरा बसला. मात्र, चळवळीला बळकटी देण्यासाठी नक्षलवाद्यांनी आता आदिवासी मुली आणि महिलांवर लक्ष केंद्रित केले आहे. अल्पवयीन मुलगी आणि महिलेला धमकी देऊन त्यांना चळवळीत नेण्याचा प्रयत्न नुकताच फसला. याप्रकरणी पोलिसांनी महिलेला अटक केली असून या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

रूपी लालू नरोटी  (वय ३२ )असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून ती भामरागड तालुक्‍यातील लाहेरी येथील रहिवासी आहे. या प्रकरणातील दिनेश पुंगाटी हा फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे.

महिला ही विवाहित असून तिला दीड वर्षाचा मुलगा आहे. तर अल्पवयीन मुलगी अशिक्षित असून ह्या दोघीही शनिवारी (ता. २३) शेतशिवारात काम करीत होत्या. दरम्यान, दुपारी दोन वाजताच्या सुमारास रूपी नरोटी ही महिला तेथे पोचली. तुम्ही नक्षल चळवळीत सामील व्हा, अन्यथा जिवे मारून टाकू, अशी धमकी दिली. आणि त्यांचे अपहरण करून भामरागड तालुक्‍यातील लाहेरी येथील दिनेश पुंगाटी याचे घरी ओलीस ठेवले. पळवून नेल्याचा संशय आपल्यावर येऊ नये, म्हणून रूपी नरोटी ही रविवार (ता.२४)  एटापल्ली येथे गेली. तिने पीडित महिलेचे घर गाठून तिच्याबाबत विचारणा केली. तिला भेटायचे होते, अशी थाप मारली. यावेळी नातेवाइकांना संशय आल्याने त्यांनी लागलीच पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गार्भीय ओळखून पोलिस पीडित महिलेच्या घरी पोचले. पोलिसांना बघून रूपी नरोटी घाबरली. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बेपत्ता महिलेबाबत विचारणा केली.

सुरुवातीला तिने उडवाउडवीचे उत्तर दिले. मात्र, पोलिसांनी दम देताच ती पोपटासारखी बोलायला लागली. आपणच त्या दोघींचे अपहरण केले आहे. त्यांना नक्षल चळवळीत सामील करायचे होते, अशी कबुली तिने दिली. पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून पीडित महिला व बालिकेला लाहेरी पोलिसांनी दिनेश पुंगाटीच्या घरून ताब्यात घेतले. या प्रकरणी एटापल्ली पोलिसांनी रूपी नरोटी व दिनेश पुंगाटी यांचेवर गुन्हा दाखल केला.

रॅकेट सक्रिय
जिल्ह्यात नक्षल चळवळीत युवक व युवतींना सामील करणारे टोळी सक्रिय असल्याची शक्‍यता आहे. पोलिस तपासात आरोपींची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक सचिन जगताप हे करीत आहेत.

Web Title: naxalite watch on women crime