गडचिरोली : एटापल्लीत नक्षलवाद्यांनी जाळले विकास कामावरील साहित्य

मनोहर बोरकर
सोमवार, 20 मे 2019

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील बुर्गी पोलिस स्टेशन हद्दीतील कर्रेमवरून बिड्री गावाकडे जाणाऱ्या मार्गावर जिल्हा परिषदच्या 30/54 योजनांतर्गत रस्ता निर्माण कामावरील सिमेंट काँक्रिट मसाला मिक्सर मशीन व इतर वापराचे साहित्य रविवारी (ता.19) रात्री दरम्यान 40 ते 50 गणवेशधारी सशस्त्र माओवाद्यांनी डिझल ओतून आग लाऊन जाळले. यात ठेकेदाराचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. तसेच गुरूपल्ली गावात बंद पाळन्याचे पोस्टर नागरिकांनी जाळून नक्षल्यांचा विरोध केल्याने धमकी दिल्याची माहिती आहे.

सदर कर्रेम ते बिड्री 4 किमी अंतराचा रस्ता तयार करण्याचे काम एटापल्लीच्या मेडीवार कंस्ट्रक्शन कंपनीचे आश्विन मेडीवार हे ठेकेदार करीत असल्याची माहिती असून जाळण्यात आलेले साहित्य सचिन खांडेकर यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.

माओवाद्यांनी पुकारलेल्या बंद दरम्यान धुमाकुळ करत गुरूपल्ली गावाजवळ वनविभागाच्या लाकडी बिटांना भरदुपारी आग लावण्यात आली होती.  यावेळी घटनेपासून काही अंतरावर गुरूपल्ली गावाजवळ काही नागरिकांनी नक्षली बॅनर जाळून जिल्हा बंदचा विरोध दर्शवत नक्षली करवायांचा धिक्कार केला होता. त्यामुळे रात्री गावातील नागरिकांवर संशय घेऊन नक्षल्यांनी आणखी काही पोस्टर व बॅनर गावात लाऊन ती जाळून दाखवा अशी धमकी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे आज तालुक्यातील सर्वच गावातील तेंदूपत्ता संकलन प्रक्रिया सुरु झाली असून गुरूपल्लीत मात्र नक्षली दहशतीत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील पोलिसांकडून नक्षल विरोधी शोध मोहीम तीव्र करण्यात आली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Naxalites burned material of development work at Etapalli Gadchiroli