नक्षलवाद्यांनी जाळले वन विभागाचे लाकूड, लाखोंचे नुकसान

etapalli
etapalli

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील ताटीगुडम गावांच्या शेजारी असलेल्या पेरमिली वनपरिक्षेत्र हद्दीच्या डेपोतील सागवानसह इतर लाकडी बीटांना (ता.26) शुक्रवारी रात्री दरम्यान आग लाऊन जाळले. यात शासनाचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.

लोकसभा निवडणुकीपासून सुरु असलेला नक्षली धुमाकुळ सुरुच असून दिनांक 10 एप्रिलला गट्टा येथील आठवडी बाजारात मतदान केंद्र कर्मचारी पथकाला लक्ष करून सायकलवर रिमोट बॉम्ब स्फोट, मतदानाच्या दिवशी 11 एप्रिलला सकाळी 11 वाजता दरम्यान वाघेझरी येथील मतदान केंद्राजवळ क्लेमोर माईल बॉम्ब स्फोट, दुपारी दोन वाजता दरम्यान टिटोळा येथील मतदान केंद्रावर पोलिसांनी 15 किलो वजनाचा भुसुरूंग निकामी केले, तर सायंकाळी चार वाजता पुरसलगोंदी मतदान केद्रांवरून मतदान प्रक्रिया राबवून पोलीस सुरक्षेत इव्हीएम मशीन घेऊन जाणारे बूथ कर्मचाऱ्यांना लक्ष करून भुसुरूंग स्फोट घडविण्यात आला होता. त्यानंतर लगेच जांबिया येथील मतदान केन्द्रावरून कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे हेलीकॉप्टरवर जंगल परिसरातून गोळीबार करण्यात आला होता, अशा सर्व घटनात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे दोन जवान व जिल्हा पोलीस विभागाचे दोन शिपाई जखमी झाले होते. 

माओवाद्यांनी गेल्या चार महिन्यात तालुक्यात धुमाकुळ घातला असून एक वर्षापूर्वी भामरागड तालुक्यातील बोरिया व कसनासुन गांव जंगल परिसरात पोलिस नक्षल चकमकित 40 नक्षली ठार झाल्याचा शाहिद सप्ताह 22 ते 28 एप्रिल दरम्यान पाळन्याचे आव्हान करणारे ब्यानर एटापल्लीच्या एका चौकात, गट्टा, जांबिया, सुरजागड परिसरात रस्त्यावर ब्यानर व झाड़े तोडून रस्त्यावर आडवी टाकून रहदारी बंद करण्यात आली आहे, त्यामुळे गेली पंधरा दिवसांपासून तालुक्यात नक्षली दहशत पसरली असल्याचे दिसुन येत आहे. 

सदर लाकडी बिट जाळल्याची माहिती गावांकऱ्यांनी पेरमिली वनपरिक्षेत्र अधिकारी शिशुपाल पवार यांना कडविन्यात आल्या  नंतर ते (ता. 27) शनिवारी दुपारी 12 वाजता घटना स्थळी पोहचून पोलिसांना माहिती देण्यात आली असून पुढील तपास बुर्गी पोलिसांकडून केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com