नक्षलवाद्यांनी जाळले टँकर, मिक्सर मशीन 

मनोहर बोरकर
गुरुवार, 9 मे 2019

एटापल्ली (गडचिरोली) : तालुक्यातील कसनसुर पोलिस स्टेशन हद्दीतील घोटसुर वरुन कारका गावाकडे जाणाऱ्या मार्गावर पंतप्रधान ग्राम सड़क योजना निर्माण कामावरील एक टँकर व सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन (ता. 8) बुधवारी रात्री दरम्यान आग लाऊन जाळून टाकले. यात ठेकेदाराचे एक लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.

सदर रस्ता निर्माण काम अमरावतीचे रामेश्वर कडू नामक ठेकेदार करीत असल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुक कार्यक्रमापासून नक्षली धुमाकुळ सुरुच असून सायकलवर रिमोट बॉम्ब स्फोट, क्लेमोर माईल बॉम्ब स्फोट, भुसुरूंग स्फोट घडविने, तसेच मतदान केन्द्रावरून कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे हेलीकॉप्टरवर जंगल परिसरातून गोळीबार करने, वनविभागाचे लाखो रुपये किंमतीचे लाकड़ी बिट जाळपोळ, अशा घटनांसह (ता. 6) सोमवारी गट्टा येथील सायकल स्टोर चालक शिशर रामचंद्र मंडल याची पोलिस खबरी असल्याचे संशयावरून हत्या करण्यात आली होती.

माओवाद्यांनी गेल्या चार महिन्यात तालुक्यात धुमाकुळ घातला असून विकास कामांवरील वाहनांची जाळपोळ करन्यासह नागरिकांचे पोलीस खबरी असल्याच्या संशयावरून अपहरण व हत्या करण्याचे सत्रच नक्षल्यांनी अवलंबले असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे गेली काही दिवसांपासून तालुक्यात नक्षली दहशत पसरली आहे. 

सदर टँकर व  मिक्सर मशीन जाळल्याने पंतप्रधान ग्राम सड़क व मुख्यमंत्री ग्राम सड़क योजनेच्या रस्ते निर्माण कामाला माओवाद्यांचा तिव्र विरोध असल्याचे दिसून येत आहे,

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: naxalites have burned tankers and mixers machine at Etapalli